मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. ३१ मार्चपूर्वी वीजबिल भरा अन् मिळवा ३० टक्के सूट, महावितरणची भन्नाट योजना

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. ३१ मार्चपूर्वी वीजबिल भरा अन् मिळवा ३० टक्के सूट, महावितरणची भन्नाट योजना

Mar 27, 2023, 11:32 PM IST

  • Mahavitaran scheme for farmers : ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची थकबाकी भरल्यास त्यांना ३० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेत पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांकडे कवळ चार दिवसांचा अवधी आहे.

महावितरणची भन्नाट योजना

Mahavitaranscheme for farmers : ३१मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाचीथकबाकी भरल्यास त्यांना ३० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेत पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांकडे कवळ चार दिवसांचा अवधी आहे.

  • Mahavitaran scheme for farmers : ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची थकबाकी भरल्यास त्यांना ३० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेत पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांकडे कवळ चार दिवसांचा अवधी आहे.

Mahavitaran electricity bill Scheme : शेतकऱ्यांनी कृषिपंप वीज बिलाचा भरणा करावा, यासाठी महावितरणकडून भन्नाट योजना आणली आहे. वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी महावितरणकडून कृषीपंपधारकांसाठी सवलत योजना जाहीर केली आहे. ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची थकबाकी भरल्यास त्यांना ३० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेत पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांकडे कवळ चार दिवसांचा अवधी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Car accident: पप्पांनीच मला गाडी दिली, मी दारूही पितो! पोरशे कार अपघातातील आरोपी मुलांची धक्कादायक कबुली

HSC Result 2024 Live : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

Navi Mumbai: मॉरेशियन नागरिकाची दगडाने ठेचून हत्या; २० वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन मुलींना अटक, परिसरात खळबळ

Pune Metro : मेट्रोने आणली भन्नाट योजना! केवळ शंभर रुपयांत करा पुणे दर्शन! असा घ्या लाभ

महावितरणच्या वतीने कृषीपंप शेतकऱ्यांसाठी कृषी धोरण२०२०राबविण्यात येत आहे. मागील वर्षी ही योजना सुरु झाली होती. तीन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या यायोजनेचे दुसरे वर्ष आहे. दुसऱ्या वर्षाची मुदत येत्या३१मार्चला संपणार आहे.

अनेक शेतकऱ्यांकडे वीजबिल थकीत आहेत, त्यामुळे महावितरणकडून थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. बिल वसुलीसाठी विशेष पथकांसोबतच शेतकऱ्यांना आवाहन करत नाविण्यपूर्ण योजना सुरू केल्या जातात. अनेक शेतकरी शेतीला पाणी भरण्यासाठी मोटरचा वापर करतात, यामुळे वीजबिल मोठी वाढ होते.

 

अशावेळी अनेकदा शेतकऱ्यांकडे वीजबिल थकीत होते. याच पार्श्वभूमीवर कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी सवलत योजना राबविली जात आहे. या धोरणा अंतर्गत जे शेतकरी ३१ मार्चपर्यंत थकीत वीजबिल भरतील, त्यांना वीजबिलावर ३० टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या