मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ७ हजार ५१० पदांची बंपर भरती, जाणून घ्या पात्रता व पगार

MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ७ हजार ५१० पदांची बंपर भरती, जाणून घ्या पात्रता व पगार

Oct 15, 2023, 10:37 PM IST

  • MPSC Jobs : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तब्बल साडे सात हजार पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांसाठी १७ डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा घेतली जाईल.

Mpsc

MPSC Jobs : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तब्बल साडे सात हजार पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांसाठी १७ डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा घेतली जाईल.

  • MPSC Jobs : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तब्बल साडे सात हजार पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांसाठी १७ डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा घेतली जाईल.

MPSC Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल ७ हजार ५१० पदांच्या बंपर पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. दुय्यम निरीक्षक,  तांत्रिक सहाय्यक,  कर सहाय्यक आणि  लिपिक-टंकलेखक आदि पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

राज्य उत्पादन शुल्क गृह विभागात  दुय्यम निरीक्षकची ६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३२ हजार ते १ लाख १ हजार ६०० रुपये पगार दिला जाईल. 

तांत्रिक सहाय्यकचे १ पद भरले जाणार असून यासाठी पदवीधर ही पात्रता आहे. या पदासाठी दरमहा २९ हजार २०० ते ९२ हजार ३०० रुपये पगार दिला जाईल. 

मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये पगार दिला जाईल. 

लिपिक-टंकलेखकच्या ७ हजार ३५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. त्यांचा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. वेग असणे आवश्यक आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९ हजार  २०० ते  ६३  हजार २०० रुपये पगार दिला जाईल. 

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होणार असून उमेदवार  ३१ ऑक्टोबर  २०२३ पर्यंत अर्ज करु शकतात. १७ डिसेंबर रोजी या पदांसाठी मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या