मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लागा तयारीला..! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

लागा तयारीला..! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Nov 23, 2023, 09:54 PM IST

  • MPSC Exam Schedule 2024 : पुढाल वर्षी होणाऱ्या सर्व पदांच्या परीक्षांसाठीचे संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

MPSC Exam Schedule 2024

MPSC Exam Schedule 2024 : पुढाल वर्षी होणाऱ्या सर्व पदांच्या परीक्षांसाठीचे संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

  • MPSC Exam Schedule 2024 : पुढाल वर्षी होणाऱ्या सर्व पदांच्या परीक्षांसाठीचे संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२४ मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, हे वेळापत्रक संभाव्य असल्यामुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. परीक्षांच्या बदलांबाबत उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

आयोगाने परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आगामी परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रक पाठवून दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या संभाव्य वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही २८ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा या परीक्षा या १४ ते १६ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांमध्ये काही बदल झाल्यास ते वेळोवेळी संकेतस्थावर उपलब्ध करुन देण्यात येतील. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना कोणता असेल याबाबत तपशील देण्यात आलाय.

संभाव्य वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती व अपडेटेड माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील देखील आयोगाच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेच्या माध्यमातून किती पदसंख्येची भरती करण्यात येणार आहे, याबाबत देखील माहिती देण्यात येणार आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना अभ्यास योग्य पद्धतीने करता यावा यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते.

 

तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच http://www.mpsc.gov.in भेट द्यावी, असं आयोगाकडू सागंण्यात आलं आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या