मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC ची गुणवत्ता यादी जाहीर; टेम्पो चालकाचा मुलगा दुसऱ्यांदा एमपीएससीत टॉपर

MPSC ची गुणवत्ता यादी जाहीर; टेम्पो चालकाचा मुलगा दुसऱ्यांदा एमपीएससीत टॉपर

Mar 01, 2023, 08:50 AM IST

    • MPSC Result : राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा २०२१च्या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सांगलीच्या प्रमोद चौगुले याने दुसऱ्यांना राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.
प्रमोद चौगुले

MPSC Result : राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा २०२१च्या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सांगलीच्या प्रमोद चौगुले याने दुसऱ्यांना राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.

    • MPSC Result : राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा २०२१च्या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सांगलीच्या प्रमोद चौगुले याने दुसऱ्यांना राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.

मुंबई: राज्यलोकसेवा आयोगाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यात सांगिळीच्या समीर चौगुले याने दुसऱ्यांना राज्यातून पहिला आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शुभम पाटीलने बाजी मारली आहे. मुलींमध्ये सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून ती राज्यात तिसरी आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

थरकाप उडवणाऱ्या पुण्यातील कार Porsche Car अपघाताचा VIDEO व्हायरल; पाहून अंगावर काटा येईल

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी काल रात्री आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेत प्रमोद बाळासाहेब चौगुले याने तब्बल ६३३.७५ गुण मिळवत राज्यात पहिला आहे. तर खुल्या गटात शुभम पाटील याने ६१६ गुण, तर महिला गटात सोनाली मात्रे यांनी ६०१.७५ गुण मिळवून अनुक्रमे दूसरा आणि तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. चौगुले याने गेल्या वर्षी देखील राज्य सेवा परीक्षेत पहिला येण्याचा मान मिळवला होता. टु सध्या उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे.

‘एमपीएससी’ने तब्बल ४०५ पदांसाठी ही परीक्षा घेतली होती. या परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २७ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. या यादीतील उमेदवारांना तीन मार्च ते १० मार्च या कालावधीत पदासाठीचे पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येणार आहेत. पुण्यात शुभम पाटील यांच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास अनेक विद्यार्थी जमले. त्यांनी फटक्यांची अतिषबाजी केली. मात्र, याला स्थानिकांनी विरोध केल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. यामुळे त्यांना जल्लोष करता आला नाही.

प्रमोद चौगुले दुसऱ्यांदा आला पहिला

मूळचा मिरज तालुक्यातील सोनी गावातील असेलल्या प्रमोद चौगुलेने सलग दुसऱ्यांदा या परीक्षीत राज्यातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. शेतकरी कुटुंबातील प्रमोद चौगुले यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्याचे वडिल टेम्पोचालक आहेत. आपल्या घराची ही परिस्थिती बडल्यासाठी प्रमोदने जिवापाड मेहनत घेतली. यातून त्याने इंजिनीअर होऊन, राज्य सेवा परीक्षेच्या निकालात राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.

प्रमोद यांनी प्राथमिक शिक्षण गावात घेतले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण पलूस जवाहर नवोदय विद्यालयात पूर्ण केले, तर इंजिनीअरिंगचे शिक्षण कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. प्रमोदने २०१९मध्ये पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल मारली. केवळ एका गुणामुळे ते गुणवत्ता यादीत येऊ शकले नाही. तरीही त्यांनी न खचता पुन्हा एकदा तयारी सुरू केली. त्यानंतर पूर परिस्थिती आणि करोनाकाळातही अभ्यास करून राज्यसेवा परीक्षेच्या २०२०च्या निकालात प्रथम आले. मात्र, पोलिस उपअधीक्षक आणि उपजिल्हाधिकारी ही पदे तेव्हा उपलब्ध नसल्याने, त्यांनी परत तयारी करून राज्यसेवा २०२१ परीक्षा दिली. आता पुन्हा या परीक्षेत राज्यातून पहिला आला आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या