मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम

Jun 15, 2023, 10:57 PM IST

  • Mpsc main exam result declared : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून यात सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. बीडची सोनाली म्हात्रे मुलींमध्ये पहिली आली आहे.

MPSC Result

Mpsc main exam result declared : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून यात सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. बीडची सोनाली म्हात्रे मुलींमध्ये पहिली आली आहे.

  • Mpsc main exam result declared : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून यात सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. बीडची सोनाली म्हात्रे मुलींमध्ये पहिली आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ७ ते ९ मे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल आज (१५ जून) जाहीर करण्यात आला आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरीता आयोगाकडून उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Couple Suicide: मुंबईच्या कांदिवलीत नैराशातून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Pune Porsche car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा थरकाप उडवणारा video व्हायरल, पाहा!

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासाहेब चौगुले हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून, सोनाली अर्जुनराव म्हात्रे या महिलांमधून तसेच विशाल महादेव यादव हे मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत.

निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांका पासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनां दिल्या असल्याची माहितीआयोगाने दिली आहे.

या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि त्यानंतर आता याच मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांना राज्यातअव्वल -

सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरच्या शुभम पाटीलने बाजी मारली आहे. मुलींमध्ये बीडच्या सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून एकूणात ती राज्यात तिसरी आली आहे. प्रमोद चौगुले हा सध्या उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे. गेल्या वर्षीही तो राज्यात पाहिला आला होता. त्याचे वडील टेम्पो चालवतात तर आई शिवणकाम करून घरखर्चाला हातभार लावते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या