मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयोगानं हट्ट सोडला! नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयोगानं हट्ट सोडला! नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

Feb 23, 2023, 06:19 PM IST

  • MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. नवा अभ्यासक्रम व बदललेली परीक्षा पद्धती याच वर्षी लागू करण्याचा हट्ट राज्य लोकसेवा आयोगानं सोडला आहे.

MPSC Student Protest

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. नवा अभ्यासक्रम व बदललेली परीक्षा पद्धती याच वर्षी लागू करण्याचा हट्ट राज्य लोकसेवा आयोगानं सोडला आहे.

  • MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. नवा अभ्यासक्रम व बदललेली परीक्षा पद्धती याच वर्षी लागू करण्याचा हट्ट राज्य लोकसेवा आयोगानं सोडला आहे.

MPSC : एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम तातडीनं लागू करण्याच्या विरोधात परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. नवा अभ्यासक्रम चालू वर्षापासूनच लागू करण्याचा हट्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सोडला असून २०२५ पासून नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

आयोगाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससीनं नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. तसंच, परीक्षा पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. हा बदललेला अभ्यासक्रम व वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा पद्धत यंदापासून सुरू करण्याचा आयोगाचा मानस होता. त्यास विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी पुण्यात गेल्या काही दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. रात्रीच्या वेळेस हातात टॉर्च घेऊन विद्यार्थी रस्त्यावर ठाण मांडून होते.

आमचा अभ्यासक्रमाला विरोध नाही, फक्त तयारीसाठी वेळ हवा, अशी त्यांची मागणी होती. विरोधी पक्षांनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: विद्यार्थ्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. काँग्रेसनंही याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळं सरकार दरबारी तातडीनं हालचाली सुरू झाल्या. राज्य लोकसेवा आयोगाला पत्र पाठवण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. त्याचा परिणाम अखेर दिसून आला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या