मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje Bhosle : “तुमसे मिलकर ना जाने क्यूँ..” उदयनराजे जेव्हा गाणं गातात, पाहा VIDEO

Udayanraje Bhosle : “तुमसे मिलकर ना जाने क्यूँ..” उदयनराजे जेव्हा गाणं गातात, पाहा VIDEO

May 20, 2023, 11:17 PM IST

  • Udayanraje Bhosle : उदयनराजे ‘प्यार झुकता नही’ या चित्रपटातील ‘तुमसे मिलकर ना जाने क्यूँ और भी कुछ याद आता है’ हे गाणं म्हणताना दिसत आहेत.

udayanraje Bhosle

Udayanraje Bhosle : उदयनराजे‘प्यार झुकता नही’ या चित्रपटातील‘तुमसे मिलकर ना जाने क्यूँ और भी कुछ याद आता है’ हे गाणं म्हणताना दिसत आहेत.

  • Udayanraje Bhosle : उदयनराजे ‘प्यार झुकता नही’ या चित्रपटातील ‘तुमसे मिलकर ना जाने क्यूँ और भी कुछ याद आता है’ हे गाणं म्हणताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील बिनधास्त नेते व आपल्या अनोख्या स्टाईलने तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले खासदार म्हणून उदयनराजे भोसले यांची ओळख आहे. त्यांची कॉलर उडवणं असो किंवा त्यांचं रोखठोक बोलणं असो ते कायमच चर्चेत असतात. आता उदयनराजेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते तुमसे मिलकर ना जाने क्यूँ हे गाणं म्हणताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

या व्हिडिओमध्ये उदयनराजे ‘प्यार झुकता नही’ या चित्रपटातील‘तुमसे मिलकर ना जाने क्यूँ और भी कुछ याद आता है’ हे गाणं म्हणताना दिसत आहेत. उदयनराजे म्हणत असलेल्या गाण्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

नुकताच उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना 'तुम्हाला गौतमी पाटील भेटायला का आली होती?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उदयनराजे यांनी पत्रकाराला उद्देशून म्हटले की, "तुमच्या चेहऱ्यावर स्माईल का आहे?” उदयनराजेंच्या या उत्तरानंतर एकच हशा पिकला.

पुढे गौतमीच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले, “गौतमी पाटील या एक कलाकार आहेत. जो कलेची दाद देतो, त्यांच्याकडेच त्या (गौतमी पाटील) जाणार ना… कलेची जाण नसणाऱ्या व्यक्तीकडे त्या का जातील? आगामी चित्रपट आणि इतर प्रकल्पासाठी माझ्याकडून त्यांना काहीतरी सहकार्य मिळेल, म्हणून त्या आल्या असतील. यासाठी त्यांना शुभेच्छा देणं आपलं कामच आहे.”

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या