मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: शिवसेना अन् उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव, संजय राऊतांचा थेट आरोप

Sanjay Raut: शिवसेना अन् उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव, संजय राऊतांचा थेट आरोप

May 15, 2023, 05:48 PM IST

  • Sanjay raut : शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडण्यासाठी माझ्यावर अशा प्रकारचा दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

Sanjay raut

Sanjay raut : शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडण्यासाठी माझ्यावर अशा प्रकारचा दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

  • Sanjay raut : शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडण्यासाठी माझ्यावर अशा प्रकारचा दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षप्रकरणी सुनावलेल्या निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जहरी टीका केली होती. याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडण्यासाठी माझ्यावर अशा प्रकारचा दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकावर गंभीर आरोप केले होते. सरकारच बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात १६ आमदारच नव्हे संपूर्ण सरकार अपात्र असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही शिंदे, फडणवीस हे बेशरमपणे, निर्लज्जपणे निकाल हा आपल्या बाजूने लागल्याचे सांगत आहेत. हे संपूर्ण सरकारच बेकायदेशीर असल्याने पोलीस, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या सरकारचे आदेश पाळू नयेत, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे नाशिक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला शिवसेनेपासून तोडण्यासाठी दबावाचे राजकारण केलं जात आहे.

 

संजय राऊत म्हणाले की, मी कोणतेही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. सामान्य माणसाच्या मनातील व्यथा मी बोलून दाखवल्या. मात्र शिवसेना व उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. मात्र मी दबावाला बळी पडणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच या सरकारमध्ये अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे, हे स्पष्ट झाले आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पुढील बातम्या