मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  RSS On BJP : अजित पवारांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आरएसएस नाराज?, भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता

RSS On BJP : अजित पवारांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आरएसएस नाराज?, भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Jul 06, 2023, 10:09 AM IST

  • Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे.

mohan bhagwat and devendra fadnavis (HT)

Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे.

  • Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे.

RSS On Maharashtra Cabinet Expansion : शिवसनेनंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे आठ आमदार मंत्री झाल्याने सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. निष्ठावंत नेत्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना मंत्रीपदं दिली जात असल्याने सत्ताधारी आमदारांमध्ये चांगलाच रोष असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सातत्याने राजकीय भूकंप होत असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. डागाळलेल्या नेत्यांना दूर करा आणि निष्ठावंतांना संधी द्या, अशा शब्दांत संघाने भाजपला फटकारल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समावेश करण्यात आल्याने सत्ताधारी आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत उत्सुक नव्हता. त्यानंतरही अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. त्यामुळं आता राज्यातील सत्तेचं शुद्धीकरण करा, भ्रष्टाचारी नेत्यांना दूर करत निष्ठावंताना संधी द्या, अशा प्रकारचा थेट आदेश संघाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळं आता भाजपमध्ये निष्ठावंत आणि दुसऱ्या पक्षातून आलेल्यांमध्ये सुप्त संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांमध्येही मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी असल्याची माहिती आहे. संजय शिरसाट आणि भारत गोगावले यांनी माध्यमांसमोर नाराजी बोलून दाखवली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत १०६ आमदारांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. याशिवाय १२ अपक्ष आमदारांचाही भाजपला पाठिंबा आहे. परंतु मंत्रिमंडळात केवळ चार ते पाचच निष्ठावंत आमदार मंत्री असल्याचं चित्र आहे. अन्य मंत्री दुसऱ्या पक्षातून आलेले आहे. याशिवाय महाराष्ट्र भाजपातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलेलं आहे. त्यातच आता अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने भाजप-शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला कडक शब्दांत फटकारत निष्ठावंतांना संधी देण्याच्या सूचना केल्या आहे.

पुढील बातम्या