मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray: राज-उद्धव एकत्र! राज ठाकरेंकडून VIDEO शेअर करत उद्धव यांच्या ‘त्या’ वक्तव्याला दुजोरा

Raj Thackeray: राज-उद्धव एकत्र! राज ठाकरेंकडून VIDEO शेअर करत उद्धव यांच्या ‘त्या’ वक्तव्याला दुजोरा

Apr 11, 2023, 04:39 PM IST

  • Raj Thackeray : मनसेच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.

Raj Thackeray

RajThackeray : मनसेच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.

  • Raj Thackeray : मनसेच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.

चंद्रकांत पाटलांनी बाबरी मशिदीबाबत केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटलांवर टीकेची झोड उठवत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आवाहन केले की, चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करावी नाहीतर बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांसोबत सरकार न चालवता स्वत: राजीनामा द्यावा. नाहीतर तुम्हाला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यानंतर आता मनसेच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers theft : पुण्यात वानवडीतील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० किलोचे दागिने लंपास

बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी हा प्रसंग ऐकण्याचे आवाहन या ट्विटच्या माध्यामातून केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन सेनाभवनमध्ये झाला हे म्हणणं चुकीचं आहे. बाबरी मशीद पाडकामाचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केलं होतं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला. या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत चंद्राकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्या दिवशी घडलेला प्रसंग देखील त्यांनी या वेळी सांगितला. हाच प्रसंग सांगणारा व्हिडीओ राज ठाकरे यांनी पुन्हा शेअर करत दुजोरा दिला आहे.

मनसे पक्षाच्या स्थापनेपासून राज आणि उद्धवमधले राजकीय मतभेद टोकाचे असले तरी त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचेही अनेक वेळा दिसले आहे. यापूर्वी आरे कारशेड बाबतही ठाकरे बंधू एक झाले होते. आजही बाळासाहेबांसाठी दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

पुढील बातम्या