मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray meets Fadnavis: राज ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय पतंगबाजी सुरू

Raj Thackeray meets Fadnavis: राज ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय पतंगबाजी सुरू

Aug 29, 2022, 01:25 PM IST

    • Raj Thackeray meets Devendra Fadnavis: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली.
Devendra Fadnavis - Raj Thackeray

Raj Thackeray meets Devendra Fadnavis: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली.

    • Raj Thackeray meets Devendra Fadnavis: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली.

Raj Thackeray meets Devendra Fadnavis: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या 'सागर' या शासकीय बंगल्यावर ही भेट झाली. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. भेट झाल्यानंतरच मीडियाला याविषयीची माहिती मिळाली. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं व मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Urulikanchan news : वीज पडल्याचा आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या दादर येथील घरी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज राज हे फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. घरच्या गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी राज यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही नेत्यांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र, ही भेट सुमारे तासभर चालल्याची माहिती समोर आल्यामुळं साहजिकच तर्कवितर्कांना उत आला आहे.

शिवसेनेतील बंडाळी घडवून आणून राज्यातील सत्ता ताब्यात घेतल्यानंतर भाजपनं आता मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केलं आहे. मोठी फूट पडल्यानंतरही मुंबई पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई महापालिका एकहाती ताब्यात घेणं भाजपसाठी तितकंसं सोपं नाही. त्यासाठी अन्य पक्षांची मदत लागणार आहे. एकनाथ शिंदे गट आता भाजपसोबत आला आहे. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या खालोखाल मुंबईत मनसेची ताकद आहे. त्यामुळं मनसेशी जुळवून घेऊन मुंबईसाठी रणनीती आखण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. 

येत्या ५ सप्टेंबर रोजी भाजपचे दिग्गज नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येत आहेत. त्या पाठोपाठ पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील मुंबईत येत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक हाच या दौऱ्यांमागचा अजेंडा असल्याचं बोललं जातं. या नेत्यांच्या भेटीआधी मनसेशी वाटाघाटी करून एखादा फॉर्मुला तयार केला जात असावा, असाही एक अंदाज आहे.

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हे उघड उघड भाजपच्या बाजूनं बोलताना दिसत आहेत. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदावर दावा करणं कसं चुकीचं आहे, हे राज वारंवार सांगत आहेत. त्याशिवाय, मशिदीवरील भोंग्यांनंतर आता त्यांनी हलाल मटणास विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. भाजपला पूरक अशाच या भूमिका असल्याचं बोललं जात आहे. यातून राज यांनी भाजपच्या जवळ जाण्याचे संकेतच दिले आहेत. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या