मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar : ‘गुजरात प्रकल्प नेतोय अन् कर्नाटक ४० गावांवर दावा ठोकतोय; शिंदे-फडणवीस मात्र झोपेत’

Rohit Pawar : ‘गुजरात प्रकल्प नेतोय अन् कर्नाटक ४० गावांवर दावा ठोकतोय; शिंदे-फडणवीस मात्र झोपेत’

Nov 23, 2022, 11:24 AM IST

    • Rohit Pawar : कर्नाटकातील भाजप सरकारनं महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या ४० गावांवर दावा ठोकला आहे. त्यावरून राजकीय वादंग पेटलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Rohit Pawar On Shinde-Fadnavis Govt (HT)

Rohit Pawar : कर्नाटकातील भाजप सरकारनं महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या ४० गावांवर दावा ठोकला आहे. त्यावरून राजकीय वादंग पेटलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

    • Rohit Pawar : कर्नाटकातील भाजप सरकारनं महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या ४० गावांवर दावा ठोकला आहे. त्यावरून राजकीय वादंग पेटलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Rohit Pawar On Shinde-Fadnavis Govt : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातल्या सातारा जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा ठोकला आहे. त्यामुळं राजकीय वादंग पेटलं आहे. कर्नाटकनं केलेल्या दाव्यावर अजून महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारनं कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळं आता विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या याच मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेलीय. एकीकडं सीमाभागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडं आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे, असं म्हणत रोहित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दोनच दिवसांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आपण अभिवादन केलं आणि आज कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतो, हे संतापजनक आहे. गुजरात आपले प्रकल्प पळवून युवांचे भविष्य चिरडतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागल्याचं सांगत रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी एका समितीचं गठण केलं आहे. त्यामुळं आता दोन्ही राज्यांतील सीमावाद हा आणखी पेटण्याची शक्यता आहे. कर्नाटक आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी सक्षम असून आवश्यकता भासल्यास आम्ही पावलं उचलू असं मुख्यमंत्री बोम्मई माध्यमांशी बोलताना म्हणाले.

पुढील बातम्या