मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आमदार मिटकरींचा एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ माझ्याकडे; NCP पदाधिकाऱ्याचा दावा

आमदार मिटकरींचा एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ माझ्याकडे; NCP पदाधिकाऱ्याचा दावा

Sep 02, 2022, 08:45 AM IST

    • राष्ट्रवादीच्या अकोल्यातील पदाधिकाऱ्याच्या आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या वादात आता पदाधिकाऱ्याकडून नवा आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी

राष्ट्रवादीच्या अकोल्यातील पदाधिकाऱ्याच्या आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या वादात आता पदाधिकाऱ्याकडून नवा आरोप करण्यात आला आहे.

    • राष्ट्रवादीच्या अकोल्यातील पदाधिकाऱ्याच्या आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या वादात आता पदाधिकाऱ्याकडून नवा आरोप करण्यात आला आहे.

अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. याआधी त्यांनी मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप केला होता. याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आमदार मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्या चारित्र्याबाबत विधान केले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी मिटकरींने केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा खळबळजनक असा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की, अकोला जिल्ह्यात पातूरच्या एका महिलेबाबतचं आमदार मिटकरींचं प्रकरण निपटण्यात आलं. यामध्ये पाया पडणाऱ्या मिटकरींचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. माझ्या चारित्र्यावर आरोप करणाऱ्या मिटकरींनी पुरावे द्यावेत. अन्यथा दहा दिवसानंतर सर्व पुरावे माध्यमांसमोर उघड करू असा इशाराही मोहोड यांनी दिला आहे.

आमदार मिटकरी यांनी एका महिलेच्या संदर्भातील प्रकरण हे अकोल्यातील एका महिला पदाधिकाऱ्याला १० लाख रुपये देऊन दाबले. अकोल्याच्या विश्रामगृहावर तीन दिवस ठेवण्यात आलेली पुण्यातील पदाधिकारी कोण होती? असा प्रश्नही शिवा मोहोड यांनी केला आहे.

दरम्यान, शिवा मोहोड यांनी मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप करताना एक व्हॉटसअॅप चॅटही व्हायरल केलं आहे. यात मिटकरी यांनी कमिशनचे १ लाख रुपये परत केल्याचा दावा केलाय. तसंच मिटकरी यांनी घेतलेल्या एका भूखंडाचा स्रोत काय? चारचाकी गाडी कुठून घेतली? असे प्रश्नही विचारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर महिलांबद्दल वाईट नजर असणाऱ्या मिटकरींचा त्यांनी कडेलोट केला असता. माझ्या चारित्र्यावर मिटकरींनी केलेले आरोप सिद्ध झाल्यास भरचौकात फाशी घेईन असंही शिवा मोहोड यांनी म्हटलं.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या