मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mira Road Murder : मृतदेहाला दुर्गंधी येऊ नये म्हणून मनोज सानेनं निलगिरी तेल विकत घेतलं होतं; चौकशीतून खुलासा

Mira Road Murder : मृतदेहाला दुर्गंधी येऊ नये म्हणून मनोज सानेनं निलगिरी तेल विकत घेतलं होतं; चौकशीतून खुलासा

Jun 12, 2023, 02:03 PM IST

  • Manoj Soni bought Nilgiri Oil : मिरारोड हत्याकांडाचा आरोपी मनोज साने याच्या क्रूरतेच्या नवनव्या कहाण्या आता समोर येत आहेत.

Manoj Sane

Manoj Soni bought Nilgiri Oil : मिरारोड हत्याकांडाचा आरोपी मनोज साने याच्या क्रूरतेच्या नवनव्या कहाण्या आता समोर येत आहेत.

  • Manoj Soni bought Nilgiri Oil : मिरारोड हत्याकांडाचा आरोपी मनोज साने याच्या क्रूरतेच्या नवनव्या कहाण्या आता समोर येत आहेत.

Manoj Soni bought Nilgiri Oil : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या मिरारोड येथील निर्घृण हत्याकांडाचा आरोपी मनोज साने याच्या क्रूर कृत्याच्या रोज नव्या कहाण्या उजेडात येत आहेत. सरस्वती वैद्यच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर मनोज साने यानं तिचे फोटो काढले होते. दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यानं निलगिरीच्या तेलाच्या पाच बाटल्या विकत घेतल्या होत्या, अशी माहिती आता चौकशीत समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

नराधम मनोज साने हा सध्या पोलीस कोठडीत आहे. तिथं त्याची कसून चौकशी सुरू आहे. साने हा रोजच्या रोज आपला कबुलीजबाब बदलत असला तरी पोलीस त्यातून अनेक घटनांची संगती लावत आहेत. सरस्वती वैद्यचा खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची ही माहिती घेण्यासाठी मनोज साने यानं अनेक वेळा गुगल सर्च केलं होतं.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करताना सानेनं खरेदी केलेल्या लाकडं कापण्याच्या कटरची साखळी निसटली होती. ती दुरुस्त करण्यासाठी तो पुन्हा त्याच दुकानात गेला होता. मृतदेह कापलेलं कटर सानेनं चांगलं स्वच्छ केलं होतं, त्यामुळं त्यानं नेमकं ते कशासाठी वापरलं याचा पत्ताही कुणाला लागू शकला नाही. मृतदेहातून दुर्गंधी येऊ नये म्हणून काय करायचं याची माहितीही त्यानं गुगलवरून घेतली होती. त्यानंतर त्याच परिसरातील एका दुकानातून त्यानं निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या आणल्या होत्या.

साने आणि सरस्वतीचं लग्न झालं होतं?

मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांनी लग्न केलं होतं. मात्र, वयामध्ये जास्त अंतर असल्यामुळं ही गोष्ट ते लोकांपासून लपवत होते. बोरिवलीतील एका मंदिरात दोघांनी लग्न केल्याचं मनोज साने यानं म्हटलं आहे. पोलीस आता त्याची शहानिशा करत आहेत. साने आणि वैद्य यांनी जिथं लग्न केलं ते ठिकाण आणि त्यांचं लग्न लावणाऱ्या पुजाऱ्याचा शोध घेतला जात आहे. त्यांच्या लग्नाला  आणखी कोण साक्षीदार आहेत, याचा शोध पोलीस घेणार आहेत.

वयाच्या फरकामुळे या जोडप्याने ओळखीच्या लोकांपासून लग्न लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. साने हे गेल्या तीन वर्षांपासून मीरा रोड परिसरातील आकाशगंगा इमारतीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये वैद्य यांच्याकडे राहत होते.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या