मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune girl rape: रेल्वे सुरक्षा दलातील हवालदाराने साथीदारासह केला छत्तीसगडमधून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Pune girl rape: रेल्वे सुरक्षा दलातील हवालदाराने साथीदारासह केला छत्तीसगडमधून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Nov 01, 2023, 01:17 PM IST

    • RPF havaldar rape on girl : आपल्या प्रियकरासओबत पुण्यात पळून आलेल्या छत्तीसगड येथील अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्याने साथीदारसह बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
RPF havaldar rape on girl

RPF havaldar rape on girl : आपल्या प्रियकरासओबत पुण्यात पळून आलेल्या छत्तीसगड येथील अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्याने साथीदारसह बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    • RPF havaldar rape on girl : आपल्या प्रियकरासओबत पुण्यात पळून आलेल्या छत्तीसगड येथील अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्याने साथीदारसह बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

RPF havaldar rape on girl : पुण्यात छत्तीसगड येथून प्रियकरसोबत पळून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील हवालदाराने त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी हवालदाराच्या साथीदाराला अटक केली आहे तर हवालदार फरार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

Pune maratha protest: नवले पुलावरील जाळपोळ प्रकरणी पुण्यात ४०० ते ५०० मराठा आंदोलकांवर गुन्हे

कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश ) असे अटक करण्यात आलेल्याचे एका आरोपीचे नाव आहे तर आरोपी हवालदार अनिल पवारहा फरार आहे. लोहमार्ग पोलिस त्याच्या मागावर आहेत. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे जण मूळचे छत्तीसगड येथील आहेत. तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून थेट पुण्यात आणले. दरम्यान, मुलीच्या घरच्यांनी मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात दिली होती.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी विरोधक आक्रमक, २५ आमदार पोलिसांच्या ताब्यात

या नंतर छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघे पुणे रेल्वे स्थानकात आल्यावर आरोपी हवालदाराने मुलीला अल्पवयीन असल्याने तिला ताडीवाला रास्ता येथील एका खासगी संस्थेत ठेवले. यावेळी मुलांच्या पालकांचा शोध घेऊन याची माहिती त्यांना देण्यात आली. दरम्यान, या अल्पवयीन मुलीवर संस्थेतील कर्मचारी तिवारी आणि हवालदार पवार या डोंघानी तिला एका खोलीत डांबून ठेऊन तिच्यावर बलात्कार केला.

 

यानंतर मुलगी ही सुखरुप असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिला पालकांच्या ताब्यात दिले. मुलीची चौकशी करण्यात आली. तेव्हा रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार पवार आणि संस्थेतील कर्मचारी तिवारीने बलात्कार केल्याची माहिती तिने दिली. त्यानंतर याप्रकरणी छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली तर रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार अनिल पवार हा फरार असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या