मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mhada Lottery : सामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला

Mhada Lottery : सामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला

Feb 15, 2024, 08:01 PM IST

  • Mhada Houses Lottery 2024 : कोकणातील तब्बल ५ हजार ३११ घरांसाठी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सोडत निघणार आहे. तब्बल २४ हजार अर्जदारांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे.

Mhada Houses Lottery

Mhada Houses Lottery 2024 : कोकणातील तब्बल ५ हजार ३११ घरांसाठी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सोडत निघणार आहे. तब्बल २४ हजार अर्जदारांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे.

  • Mhada Houses Lottery 2024 : कोकणातील तब्बल ५ हजार ३११ घरांसाठी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सोडत निघणार आहे. तब्बल २४ हजार अर्जदारांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे.

सर्वसामान्य नागरिक तसेच कोकणवासीयांच्या आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला असून २४ फेब्रवारी रोजी सोडत काढली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ही सोडत काढली जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली.. तु माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

आता कोकणातील तब्बल ५ हजार ३११ घरांसाठी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सोडत निघणार आहे. तब्बल २४ हजार अर्जदारांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. आतापर्यंत तीन वेळा सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. 

कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांसाठी १५  सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली होती. त्यानंतर १७ नोव्हेंबरला मुदत याची संपली. या मुदतीत  ३१ हजार ४३३ अर्ज सादर झाले. त्यातील अनामत रक्कमेसह अर्ज सादर करणारे २४ हजार ३०३ अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरले आहेत.

येत्या २४ फेब्रुवारी रोजी कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असतानाच म्हाडाच्या मुंबई मंडळानेही १ हजारांहून अधिक घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार, पुढील सहा महिन्यांत लॉटरीसाठीची घरे तयार करत प्राधिकरण सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून यापूर्वीच ४ हजार घरांची लॉटरी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात आली होती. लॉटरीमधील विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता पुढील लॉटरीची प्रक्रियाही मुंबई मंडळाने सुरू केली आहे. गोरेगाव पहाडी येथे लॉटरीमधील घरांसाठीचे काम सुरू असून, मुंबईत वेगवेगळ्या माध्यमांतून मिळणाऱ्या घरांचा समावेशही लॉटरीत केला जाणार आहे.

म्हाडाची मुंबई आणि कोकणसह राज्यभरातही इतर मंडळे आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीचा यात समावेश असून, या प्रत्येक मंडळाची प्रत्येक वर्षी घरांची लॉटरी काढली जाते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या