मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Modi In Pune : मोदींच्या कार्यक्रमापूर्वीच वाहतुकीचा बोजवारा; रंगीत तालीम सुरू असल्याने रस्ते बंद, पुणेकरांचा संताप

Modi In Pune : मोदींच्या कार्यक्रमापूर्वीच वाहतुकीचा बोजवारा; रंगीत तालीम सुरू असल्याने रस्ते बंद, पुणेकरांचा संताप

Jul 31, 2023, 03:40 PM IST

    • PM Narendra Modi In Pune : पीएम मोदी येणार असल्याने पुण्यात जोरदार तयारी करण्यात येत आहे. कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
PM Narendra Modi In Pune (प्रातिनिधिक फोटो) (HT)

PM Narendra Modi In Pune : पीएम मोदी येणार असल्याने पुण्यात जोरदार तयारी करण्यात येत आहे. कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

    • PM Narendra Modi In Pune : पीएम मोदी येणार असल्याने पुण्यात जोरदार तयारी करण्यात येत आहे. कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

PM Narendra Modi In Pune : टिळक स्मारक समितीकडून जाहीर करण्यात आलेला लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार आहे. त्यामुळं स्थानिक प्रशासन, राज्य सरकार तसेच भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. आज सकाळपासून शहराच्या मध्यवर्ती भागासह मुख्य मार्गांवर पोलिसांकडून बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात येत आहे. पुण्याच्या मध्यभागातील मुख्य रस्ते अचानक बंद करण्यात आल्याने वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं पुणेकरांनी संताप व्यक्त करत मोदींच्या कार्यक्रमासाठी मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याची काय गरज होती?, असा सवाल केला आहे. पुण्यातील अनेक मार्ग आतापासूनच बंद करण्यात येत शहराच्या मध्यवर्ती भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पुणे शहरातील ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर पुणे पोलिसांकडून रंगीत तालीम घेतली जात आहे. परिणामी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. प्रमुख रस्ते तसेच चौकातील रस्त्यांवर बॅरीकेटींग उभारण्यात आले आहे. त्यामुळं शहरातील वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. शहरात अचानक वाहतूक बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शाळेत जाणारे विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय झाल्यामुळं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय दिवसा रंगीत तालीम घेण्याचं काय कारण होतं?, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

उद्या म्हणजेच मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल होणार आहे. शहरात दाखल होताच पीएम मोदी शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात गणपतीचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यास मोदी उपस्थित राहणार आहे. सर परशूराम महाविद्यालय परिसरात टिळक स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पीएम मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं देखील उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळं पुणे शहरातील मध्यवर्ती भागांसह आजूबाजूच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुढील बातम्या