मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Fire News : पुण्यातील पीयूष ज्वेलर्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Pune Fire News : पुण्यातील पीयूष ज्वेलर्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Aug 17, 2023, 12:48 PM IST

    • Fire Incident In Pune : पुण्यातील पीयूष ज्वेलर्स या दुकानात आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानातून आगीचे लोट निघत असल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.
Fire Incident In Piyush Jewellers Pune (HT)

Fire Incident In Pune : पुण्यातील पीयूष ज्वेलर्स या दुकानात आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानातून आगीचे लोट निघत असल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.

    • Fire Incident In Pune : पुण्यातील पीयूष ज्वेलर्स या दुकानात आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानातून आगीचे लोट निघत असल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.

Fire Incident In Piyush Jewellers Pune : पुण्यातील वानवडी भागातील पीयूष ज्वेलर्स या दुकानात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास दुकानात आग लागली असून त्यात कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. परंतु लाखो रुपयांचं साहित्य आणि ज्वेलरी जळून खाक झाली आहे. त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलं आहे. त्यानंतर आता परिसराच्या कूलिंगचं काम हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. आग कशामुळं लागली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वानवडी भागातल्या पीयूष ज्वेलर्समध्ये मध्यरात्री अचानक आग लागली. दुकानातून धुराचे लोट निघत असल्याचं समजताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांकडूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं असून त्यानंतर आता परिसराच्या कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे. ज्लेसर्सच्या दुकानात लागलेल्या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, लाखो रुपयांची संतत्ती जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वानवडीतील पीयूष ज्वेलर्समध्ये लागलेल्या आगीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दुकानातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय अग्निशमन दलाचे जवान पाण्याचे फवारे मारत आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. मध्यरात्री लागलेल्या आगीत पीयूष ज्वेलर्स ही दुकान संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्यामुळं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या