मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Fire Incident : पुण्यातील कोंढव्यात २० गोडाऊनमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Pune Fire Incident : पुण्यातील कोंढव्यात २० गोडाऊनमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Jun 18, 2023, 12:37 PM IST

    • Kondhawa Fire Incident : कोंढव्यातील वेगवेगळ्या २० गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Kondhawa Pune Fire Incident (HT)

Kondhawa Fire Incident : कोंढव्यातील वेगवेगळ्या २० गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Kondhawa Fire Incident : कोंढव्यातील वेगवेगळ्या २० गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kondhawa Pune Fire Incident : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीत आग लागल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कोंढवा परिसरातल्या तब्बल २० गोडाऊनमध्ये आग लागली आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. आग लागल्याच्या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यानंतर आता महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखळ झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडूनही बचाव कार्य जारी असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कोंढवा परिसरातल्या गंगाधाम चौकाजवळ असलेल्या आईमाता मंदिराजवळील गोदामांमध्ये भीषण आग लागली आहे. आग लागलेल्या २० गोदामांमध्ये बिस्कीट, सिमेंट, मोल्डिंग आणि अन्य साहित्य भरलेली आहे. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही आग लागली असून यात कोट्यवधींचं साहित्य जळून खाक झालं आहे. आग कशामुळं लागली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु अग्निशमन दलाच्या २२ गाड्या आणि जवानांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न जारी आहे. याशिवाय पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

आज पहाटे मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुण्यातील कोंढवा परिसरातील तब्बल २० गोडाऊनला आग लागल्याची घटना समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला असला तरी तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं वाढतं तापमान हे आगीच्या घटनांसाठी कारणीभूत ठरत आहे. पुण्यात लागलेल्या या आगीनंतर आता बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. आग नियंत्रणात आणल्यानंतर परिसराचं कूलिंग केलं जाणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या