मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire : मुंबईत ओशिवरा फर्निचर मार्केटजवळ भीषण आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire : मुंबईत ओशिवरा फर्निचर मार्केटजवळ भीषण आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

Mar 13, 2023, 01:13 PM IST

  • Mumbai Oshiwara furniture market Fire News : मुंबई येतील ओशिवरा फर्निचर मार्केटजवळ भीषण आग लागली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अग्निशामक दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

Oshiwara furniture market fire news

Mumbai Oshiwara furniture market Fire News : मुंबई येतील ओशिवरा फर्निचर मार्केटजवळ भीषण आग लागली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अग्निशामक दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

  • Mumbai Oshiwara furniture market Fire News : मुंबई येतील ओशिवरा फर्निचर मार्केटजवळ भीषण आग लागली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अग्निशामक दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

Mumbai Oshiwara furniture market Fire News : ओशिवराफर्निचर मार्केटजवळील जोगेश्वरी येथे सोमवारी सकाळी भीषण आग लागली. आगीचे लोळ दूरपर्यन्त दिसत असल्याने आगीची दाहकता दिसून येत होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यंग नेमकी कशी लागली ही समजू शकले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याचे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग आज सकाळी ११ वाजता लागली. ओशिवराफर्निचर मार्केटजवळील जोगेश्वरी येथे असेलल्या घास कंपाऊंड, रिलीफ रोड येथील फर्निचरच्या गोदामाला आग लागली.

ही आग आग सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली असल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केला असून या बाबतची पुष्टी होऊ शकली नाही. या आगीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. ग्रँडमास्टर शिफुजी, कमांडो ट्रेनर आणि अभिनेते यांनी ट्विटरवर या आगीचे व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयांना देखील टॅग करत या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजना करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या