मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Car Accident : पुणे-पानशेत रोडवर अपघात, कारसह धरणात बुडालेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Pune Car Accident : पुणे-पानशेत रोडवर अपघात, कारसह धरणात बुडालेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Aug 31, 2023, 09:32 AM IST

    • Khadakwasala Dam Accident : अपघात झाल्यानंतर भरधाव कार थेट खडकवासला धरणात शिरली. त्यामुळं किमान चार ते पाच जण कारसह धरणात बुडाले आहे.
Khadakwasala Dam Car Accident (HT)

Khadakwasala Dam Accident : अपघात झाल्यानंतर भरधाव कार थेट खडकवासला धरणात शिरली. त्यामुळं किमान चार ते पाच जण कारसह धरणात बुडाले आहे.

    • Khadakwasala Dam Accident : अपघात झाल्यानंतर भरधाव कार थेट खडकवासला धरणात शिरली. त्यामुळं किमान चार ते पाच जण कारसह धरणात बुडाले आहे.

Khadakwasala Dam Car Accident : पुणे जिल्ह्यातील सिंहगड-पानशेत रोडवरील कुरण फाट्याजवळ भरधाव कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोन वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्यानंतर अपघातग्रस्त कार कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात गेली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. स्थानिक नागरीक आणि वेल्हे पोलिसांच्या मदतीने तीन ते चार लोकांना वाचवण्यात आलं असून अन्य दोन बेपत्तांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर आता पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. कारसह धरणात बुडालेल्या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास पुणे-सिंहगड-पानशेत रोडवरील कुरण फाट्याजवळ कारला भीषण अपघात झाला. त्यामुळं भरधाव कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात गेली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारमध्ये बुडालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. स्थानिकांनी पाण्यात उड्या मारून तीन ते चार लोकांना वाचवलं आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही प्राण गमवावा लागलेला नाही. परंतु अपघातग्रस्त कारमध्ये आणखी एक ते दोन लोक असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता त्यांना पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

भरधाव कार खडकवासला धरणात शिरल्याची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आलं असून बेपत्ता लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलं आहे. कार धरणात गेल्याची घटना समोर आल्यानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच खडकवासला धरणात सात मुली बुडाल्या होत्या, त्यानंतर आता भरधाव कार धरणात गेल्याची घटना समोर आल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुढील बातम्या