मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sindhudurg Car Accident : ‘देव तारी त्याला कोण मारी?’, कार दरीत कोसळूनही सर्व पर्यटक सुखरुप बचावले!

Sindhudurg Car Accident : ‘देव तारी त्याला कोण मारी?’, कार दरीत कोसळूनही सर्व पर्यटक सुखरुप बचावले!

Aug 13, 2023, 07:40 AM IST

    • Sindhudurg Car Accident : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Car Accident In Amboli Ghat Sindhudurg (HT)

Sindhudurg Car Accident : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Sindhudurg Car Accident : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Car Accident In Amboli Ghat Sindhudurg : मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानात आता कोकणातील आंबोली घाटातून धक्कादायक घटना समोर आली आहे. फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची एक कार दरीत कोसळली आहे. कार झाडावर आदळून अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याशिवाय अपघाताच्या काही वेळातच सिंधुदुर्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कारमधील सर्व पर्यटकांना बाहेर काढलं आहे. त्यानंतर आता घाटातील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली असून महामार्गालगत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंबोली घाटात धोकादायक वळणांवर सावधानतेनं वाहनं चालवण्याच्या सूचना वाहनचालकांना पोलिसांकडून करण्यात आल्या आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा मध्य प्रदेशातून कोकणात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची कार आंबोली घाटात कोसळली आहे. अपघातग्रस्त कार दरीतील झाडाला धडकून अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व पर्यटकांना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढलं आहे. अपघातात पर्यटकांना किरकोळ मार लागला असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कार दरीत कोसळल्याच्या घटनेनंतर आंबोली घाटात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. चालकाचं भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. कारमध्ये एकूण पाच पर्यटक होते. त्यांना सुखरुप वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

कार दरीत कोसळल्यानंतर अंधाराच्या काळोखात सिंधुदुर्ग पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं. पोलिसांनी अपघातात जखमी झालेल्या सर्व पाचही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढत त्यांना उपचारासाठी आंबोलीत आणलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आंबोली घाटातील वाहतूक काही काळासाठी बंद केली आहे. तसेच पर्यटकांना घाटात जाताना काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहे. आंबोली घाटात झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या