मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, केल्या अनेक घोषणा

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, केल्या अनेक घोषणा

Sep 17, 2022, 08:26 AM IST

    • Marathwada Mukti Sangram Din:  १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Marathwada Mukti Sangram Din: १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

    • Marathwada Mukti Sangram Din:  १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

Marathwada Mukti Sangram Din: भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याला १३ महिन्यांनी स्वातंत्र्य मिळाले. यासाठी मराठवाड्यातील लोकांना संघर्ष करावा लागला आणि अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. म्हणूनच १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की," मुक्तीसंग्रामाचा हा लढा प्रचंड होतं. या लढ्यात ज्यांनी सहभाग घेतला त्यांना मी अभिवादन करतो."

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local : मुंबईत वादळी पावसाने ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत; ठाणे, घाटकोपर स्टेशनवर तुडूंब गर्दी, नोकरदारांचे हाल

Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यभरात वादळी वारे अन् अवकाळीचा तडाखा, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

VIDEO : मुंबईत एका तासातच पावसाने हाहाकार..! पार्किंग लिफ्ट कोसळली, पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळून ८ जण ठार, ६० जखमी

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभागी झालेल्या, रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना त्यांच्या बलिदानाबद्दल अभिवादन. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा हा लढा सोपा नव्हता. पण रझाकारीच्या जोखडातून स्वत:ची मुक्तता करून स्वातंत्र्याच्या पहाट अनुभवनण्यासाठी वीरांनी बलिदान दिले. त्याबद्दल सर्व वीरांचे जनतेच्या वतीने आभार मानले. अनेकांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केल्या अनेक घोषणा
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही घोषणाही केल्या. केंद्र सरकारकडून स्वच्छ भारतसाठी १२ हजार कोटी रुपये मिळाल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी 136 कोटींचा निधी, पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार असल्याचंही ते म्हणाले. याशिवाय जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार, मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प, जालना पाणीपुरवठा नूतनीकरण करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार आहोत. लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद करण्यात येईल आणि मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता इत्यादींची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

दौरा १५ मिनिटांचाच असल्याचा शिवसेनेचा आरोप
दरम्यान, औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला केवळ १५ मिनिटे हजेरी लावल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. यानंतर ते हैदराबादला रवाना झाले आहेत. हैदराबाद दौऱ्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हैदराबादमध्ये तीन राज्याचा कार्यक्रम आहे. तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र, राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला आमंत्रण असून तिथेही मी जाणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या