मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : मराठा अन् कुणबीमध्ये फरक.. कोणताही ९६ कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही; राणेंचा दावा

Maratha Reservation : मराठा अन् कुणबीमध्ये फरक.. कोणताही ९६ कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही; राणेंचा दावा

Oct 19, 2023, 07:43 PM IST

  • Narayan rane on kunbi certificate : मराठा व कुणबी यामध्ये फरक असून कोणताही ९६ कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला असून मनोज जरांगे यांनी घटनेचा अभ्यास करावा असला सल्लाही दिला आहे.

Narayan rane

Narayan rane on kunbi certificate : मराठा व कुणबी यामध्ये फरक असून कोणताही ९६ कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला असून मनोज जरांगे यांनी घटनेचा अभ्यास करावा असला सल्लाही दिला आहे.

  • Narayan rane on kunbi certificate : मराठा व कुणबी यामध्ये फरक असून कोणताही ९६ कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला असून मनोज जरांगे यांनी घटनेचा अभ्यास करावा असला सल्लाही दिला आहे.

मी ९६ कुळी मराठा आहे, कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही, असा पुनरूच्चार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळे आहेत, मी आयुष्यात कुणबी दाखला घेणार नाही, असंही नारायण राणे म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

राणे म्हणाले की, मराठा आणि कुणबी याच्यात फरक आहे. मनोज जरांगे यांनी घटनेचा अभ्यास करावा. जातीला किंवा वर्गाला आरक्षण देताना घटनेचा अभ्यास करावा लागतो. मी भरपूर अभ्यास केला आहे, त्यामुळे मला माहिती आहे घटना काय सांगते. मी मराठा आहे, मला कुणबी प्रमाणपत्र नको. कुठलाही ९६ कुळी मराठा, कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही.

दरम्यान मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला असून प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवून मनोज जरांगेंना पुढचे मुख्यमंत्री करू, असा निर्धार सकल मराठा क्रांती मोर्चानं केला आहे. मनोज जरांगे-पाटलांचे वादळ आता पवारांच्या बालेकिल्ल्यात धडकणार असून या वादळाचे धक्के प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. 

मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर मराठा नेते आक्रमक -

जालन्यातील अंबडचे रहिवासी असलेल्या सुनील बाबुराव कावळे या तरुणाने मुंबईत आत्महत्या  केल्यानंतर मराठा नेते आक्रमक झाले आहेत. सरकारमुळेच मराठा तरुणांचे बळी जातायत, असा आरोप जरांगें यांनी केला असून आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसेल तर परिणाम तीव्र होतील, असा इशारा विनोद पाटलांनी सरकारला दिला आहे. सुनील कावळे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी आठ वाजता संभाजीनगर मधल्या मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार आरक्षणावर भूमिका घेत नसल्याने मराठा तरुण हवालदिल आणि हतबल झाले आहे. गेल्या काही वर्षात चार मुख्यमंत्री बदलले परंतु अद्यापही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, असा आरोप मराठा नेत्यांनी केला आहे. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या