मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation: 'मराठा समाजात तुम्हाला किंमत ठेवायची असेल तर...'; नितेश राणेंचा जरांगेंना थेट इशारा

Maratha Reservation: 'मराठा समाजात तुम्हाला किंमत ठेवायची असेल तर...'; नितेश राणेंचा जरांगेंना थेट इशारा

Nov 01, 2023, 03:35 PM IST

  • Manoj Jarange Patil : तुमची किंमत मराठा समाजामध्ये ठेवायची असेल तर मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भाष्य करू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 

nitesh rane

Manoj Jarange Patil : तुमची किंमत मराठा समाजामध्ये ठेवायची असेल तर मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भाष्य करू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

  • Manoj Jarange Patil : तुमची किंमत मराठा समाजामध्ये ठेवायची असेल तर मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भाष्य करू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 

Nitesh Rane Warns Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यापूर्वी आमरण उपोषणाच्या सातव्या दिवशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत म्हटलं होतं की, एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय आहे. या टीकेनंतर भाजप नेते प्रसाद लाड,प्रवीण दरेकर आणि नितेश राणेंनी जरांगे पाटलांवर राजकीय भाष्य केल्याप्रकरणी टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

नितेश राणेंनी म्हटलं आहे की, जरांगेंना माध्यमांसमोर बोलण्यासाठी स्क्रिप्ट कोण लिहून देत आहे? असा सवाल उपस्थित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, नितेश राणेंनी काही बोलू नये. यावरुन आता नितेश राणेंनी मनोज जरांगेंना थेट इशाराच दिला आहे.

नितेश राणेंनी मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना बुधवारी सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जरांगे पाटलांनी कठोर शब्दांमध्ये नितेश राणेंवर निशाणा, आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. काल माझ्याशी फोन करुन गोडगोड बोलतात. पण आता याच्यापुढे बोलू नका,असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांना भेटल्यावर सांगतो मी बोलवता धनी कोण आहे आणि काय आहे, असं उत्तर दिलं. या टीकेलाही नितेश राणेंनी उत्तर दिलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नितेश राणेंनी त्यांना इशारा दिला आहे. माझी किती किंमत आहे ना हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना माहिती आहे. तुमची किंमत मराठा समाजामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही राजकीय बोलायचं बंद करा,असं नितेश राणे म्हणाले आहेत. तुम्हाला तुमची किंमत ठेवायची असेल तर फडणवीसांवर आणि राजकीय बोलायचं थोडं बंद करा.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या