मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update: उत्तर भारतानंतर महाराष्ट्रात पडणार कडाक्याची थंडी; तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Weather Update: उत्तर भारतानंतर महाराष्ट्रात पडणार कडाक्याची थंडी; तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Dec 25, 2022, 12:10 PM IST

    • Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. त्यातच परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update (HT)

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. त्यातच परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होण्याची शक्यता आहे.

    • Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. त्यातच परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : गेल्या आठवड्याभरापासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे. वाढत्या थंडीमुळं अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या असून येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हिमालयातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं राज्याच्या तापमानाचा पारा खाली येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय गेल्या तीन आठवड्यांपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यानं त्याचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावरही होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Dadar Traffic change: महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते ?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

हवामान खात्यानं जारी केलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये तापमानात हळूहळू कमी होत असल्याचं चित्र आहे. मुंबई आणि पुण्यात तापमानात वेगानं घट झालेली नसल्यानं या शहरांतील तापमान स्थिर आहे. परंतु राज्यातील ग्रामीण भागांमध्ये सातत्यानं तापमानात घट होत असल्यानं थंडीचा पारा वाढत आहे. त्यामुळं लोकांनी स्वेटरसह उबदार कपडे वापरायला सुरुवात केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा...

रब्बी पिकांचा हंगाम सुरू होऊनही सुरुवातीच्या दोन महिन्यांत थंडीचा कडाका वाढला नव्हता. परंतु आता थंडीचं प्रमाण वाढल्यानं त्यामुळं गहू, मका आणि इतर पिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यामुळं खरीप पीक हातातून गेल्यानंतर वाढलेल्या थंडीमुळं शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातून मोठं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या