मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये सभा, आंदोलनाची दिशा ठरणार

Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये सभा, आंदोलनाची दिशा ठरणार

Dec 23, 2023, 09:20 AM IST

  • Manoj Jarange Sabha : मनोज जरांगे पाटील यांची आज बीड येथे जाहीर सभा असून या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची भूमिका जरांगे आज स्पष्ट करण्याची शक्यता आहे. 

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Sabha : मनोज जरांगे पाटील यांची आज बीड येथे जाहीर सभा असून या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची भूमिका जरांगे आज स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

  • Manoj Jarange Sabha : मनोज जरांगे पाटील यांची आज बीड येथे जाहीर सभा असून या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची भूमिका जरांगे आज स्पष्ट करण्याची शक्यता आहे. 

Manoj Jarange Beed Sabha for Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला वेळ उद्या २४ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जरांगे पाटील हे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, आज त्यांची बीड येथे सभा होणार असून या सभेसाठी खास तयारी करण्यात आली आहे. चोख पोलिस बंदोबस्तात ही सभा होणार असून मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सभेसाठी तब्बल १० रुग्णवाहिका आणि २०१ जेसीबी तैनात ठेवण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Maharashtra weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! तापमानात मोठी घट, मुंबई, पुणेकर गारठले

मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यात यावा या साठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र, अद्याप मराठा अरक्षणावर कोणताही निर्णय झालेला नाही. राज्य सरकारणे या साठी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी दर्शवली. मात्र, मजोज जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान त्यापूर्वी आज बीड शहरात मनोज जरांगे यांची मोठी सभा होणार आहे. या सभेतून जरांगे हे पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करतील अशी शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात मराठा नागरीक या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जरांगे पाटील नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

MLA Sunil Kedar : न्यायालयाने शिक्षा ठोठावताच सुनील केदार यांची प्रकृती बिघडली; छाती दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

या सभेसाठी जरांगे पाटील हे शुक्रवारी रात्री बीड जवलीन मांजरसुंबा येथे मुक्कामी पोहचले आहे. आज सकाळी ते मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैयावरून बीड शहरासाठी निघतील. दहा वाजता बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली ही अण्णाभाऊ साठे चौक आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सभास्थळी पोहचेल. यानंतर दुपारी दोन नंतर सभेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी या सभेसाठी तडगा बंदोबस्त ठेवला आहे. काल पोलिसांनी शहरातून संचलन केले होते. आज होणाऱ्या सभेसाठी १ अप्पर पोलिस अधिक्षक, ४ पोलिस उपअधिक्षक, ८ पोलिस निरिक्षक, ७० पोलिस उपनिरिक्षक, ५६० पोलिस अंमलदार, ६०० होमगार्ड, ५ दंगल नियंत्रक पथक, २ क्युआरटी पथके, एसआरपीएफचे ३०० जवान व सभा स्थळी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे.

बीड शहरातील पाटील मैदानावर ही सभा होणार आहे. पाटील यांच्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी तीनशे क्विंटल तांदूळ व शंभर क्विंटल साबुदाणा खिचडी टायर केली जाणार आहे. तर दोन ट्रक केळी आणि १ लाख पाणी बॉटल वाटल्या जाणार आहे. सभा मार्गावरून २०१ जेसीबीच्या साह्याने जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तर सभा सुरू असतांना हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टि केली जाणार आहे.

पुढील बातम्या