मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “९६ कुळी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत”, नारायण राणेंच्या वक्तव्यावर जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले..

“९६ कुळी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत”, नारायण राणेंच्या वक्तव्यावर जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले..

Sep 14, 2023, 08:44 PM IST

  • jarange patil on Narayan Rane : नारायण राणे म्हणाले की, ९६ कुळी  मराठा सामाजाने सरसकट कुणबी दाखल्याची मागणी केलेली नाही. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

jarange patil on Narayan rane

jarange patil on Narayan Rane : नारायण राणे म्हणाले की, ९६ कुळी मराठा सामाजानेसरसकट कुणबी दाखल्याची मागणी केलेली नाही. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

  • jarange patil on Narayan Rane : नारायण राणे म्हणाले की, ९६ कुळी  मराठा सामाजाने सरसकट कुणबी दाखल्याची मागणी केलेली नाही. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. मनोज जरांगे यांनी उपोषण सुटल्यावर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन  मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत आपली भूमिका मांडली. मराठ्यांना सरसकट आरक्षण न देता आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणीही राणे यांनी केली आहे. यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

मनोज जरांगे पाटलांनी गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आमरण उपोषण आज स्थगित केले मात्र त्यांच्याकडून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने मागितल्याप्रमाणे एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर, आज (१४ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्युस पिऊन त्यांनी १७ दिवसांचं उपोषण सोडलं. उपोषण सोडलं असलं तरीही मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्रच्या मागणीसाठी जरांगे पाटील आग्रही आहेत. मात्र त्यांच्या या मागणीवर भाजप नेते नारायण राणे यांनी आक्षेप घेतला आहे. 

नारायण राणे म्हणाले की, ९६ कुळी मराठा सामाजाने सरसकट कुणबी दाखल्याची मागणी केलेली नाही. हा निर्णय घेताना राज्य सरकारने घटनेतील कलम १५ चा अभ्यास करावा. सामाजिक,  शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले मराठा समाजाचे जे लोक आहेत त्यांना आरक्षण द्यावं. सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

नारायण राणेंच्या दाव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ही आमची मागणी आहे. कुणबी जात प्रमाणपत्र घ्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. या आरक्षणामुळे गोरगरीब मराठा समाजातील मुलांचे  कल्याण होणार आहे. ज्यांना शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण लागतं तर ते कुणबी प्रमाणपत्र  प्रशासनाकडे अर्ज करून काढू शकतात. मात्र प्रमाणपत्र घेतलंच पाहिजे, अशी सक्ती नाही.  प्रमाणपत्र कोणी घरात आणून देणार नाही. तुम्ही गेलात तर ते देणार आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र लागू झालं तर कोणावरही जबरदस्ती करण्यात येणार नाही. ज्यांना आवश्यक आहे, अस्तित्व टिकवण्यासाठी मराठ्यांची गोरगरीब पोरं जातप्रमाणपत्र घेऊ शकतात. ही यामागची मूळ भूमिका आहे, असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं.

पुढील बातम्या