मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mamata Banerjee : ‘मातोश्री’वर जाऊन ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी

Mamata Banerjee : ‘मातोश्री’वर जाऊन ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी

Aug 30, 2023, 09:10 PM IST

  • Mamata Banerjee Raksha bandhan with Uddhav thackeray :  INDIA आघाडीच्या बैठकीसाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या असून त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना राखी बांधली

Mamata Banerjee Raksha bandhan with Uddhav thackeray

Mamata Banerjee Raksha bandhan with Uddhav thackeray : INDIA आघाडीच्या बैठकीसाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या असून त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना राखी बांधली

  • Mamata Banerjee Raksha bandhan with Uddhav thackeray :  INDIA आघाडीच्या बैठकीसाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या असून त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना राखी बांधली

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर जाऊन रक्षाबंधन साजरे केले. देशभरात आज रक्षाबंधन मोठ्या धडाक्यात साजरे होत असताना राजकीय नेत्यांकडूनही आज मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यभरात वादळी वारे अन् अवकाळीचा तडाखा, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

VIDEO : मुंबईत एका तासातच पावसाने हाहाकार..! पार्किंग लिफ्ट कोसळली, पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळून ३ जण ठार, ६० जखमी

mumbai storm : मुंबई, ठाणे शहरात धुळीच्या वादळाचे थैमान, हजारो घरांमध्ये धूळ आणि कचरा, पावसाचीही हजेरी, मेट्रो कोलमडली

Anna Hazare on Voting : अण्णा हजारे आता निवडणुकीवर बोलले! म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना मत देऊ नका! कारण…

इंडिया आघाडीची बैठक उद्यापासून मुंबईत होत आहे. या दोन दिवसीय बैठकीसाठी काँग्रेससह विरोधी पक्षातील दिग्गज नेते मुंबईत दाखल होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईत दाखल झाल्या. आदित्य ठाकरेंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंची ममता बॅनर्जींनी आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंनी राखी बांधली. इंडिया बैठकीसाठी आलेल्या ममता बॅनर्जी यांनी बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांना राखी बांधल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही राखी बांधली. ममता यांनी उद्धव ठाकरेंना भाऊ मानलं. यावेळी, मातोश्रीवर रश्मी ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली.

अमिताभ बच्चन यांना राखी बांधल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'आज मी आनंदी आहे, मी बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांची आज भेट घेतली आणि त्यांना राखी बांधली. मला बच्चन कुटुंब खूप आवडते. हे भारतातील नंबर १ कुटुंब आहे. मी त्यांना दुर्गापूजा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. ममता बॅनर्जी जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घरी पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होते. जया बच्चन यांनी त्यांना मिठी मारली. यावेळी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिने ही त्यांचे स्वागत केले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या