मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ट्रक व कारचा भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ट्रक व कारचा भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

Dec 17, 2023, 11:00 PM IST

  • Pune -Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर भरधाव ट्रक कारवर कोसळल्याने कारमधूल चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात संगमनेर तालुक्यात झाला.

Pune -Nashik Highway Accident

Pune -Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर भरधाव ट्रक कारवर कोसळल्याने कारमधूल चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात संगमनेर तालुक्यात झाला.

  • Pune -Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर भरधाव ट्रक कारवर कोसळल्याने कारमधूल चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात संगमनेर तालुक्यात झाला.

नाशिक पुणे महामार्गावर कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. माल वाहतूक ट्रक कारवर कोसळल्याने कार ट्रकखाली चिरडली गेली. या अपघातात अकोले तालुक्यातील चार जणांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला. 

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांच्या घटना वाढल्या असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. ट्रकवर भरधाव जीप आदळून झालेल्या अपघातात एकाट कुटूंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एक अपघात झाला आहे. नाशिक पुणे महामार्गावर भरधाव ट्रक कारवर आदळल्याने कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी तत्काळ बचावमोहीम सुरू केली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकखाली दबून चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली. क्रेनने कार तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा रागल्या होत्या. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला. दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजुला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या