मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महावितरणचा अजब कारभार... कनेक्शन नाही, वीज वापर नाही तरीही शेतकऱ्याला तब्बल ९ हजाराचं बिल, काय आहे प्रकार?

महावितरणचा अजब कारभार... कनेक्शन नाही, वीज वापर नाही तरीही शेतकऱ्याला तब्बल ९ हजाराचं बिल, काय आहे प्रकार?

Aug 08, 2023, 06:43 PM IST

  • Mahavitran news : वीज कनेक्शन नसताना एका शेतकऱ्यास तब्बल ९ हजाराचे बिल आले आहे. याविरोधात शेतकऱ्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mahavitran

Mahavitran news : वीज कनेक्शन नसताना एका शेतकऱ्यास तब्बल ९ हजाराचे बिल आले आहे. याविरोधात शेतकऱ्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Mahavitran news : वीज कनेक्शन नसताना एका शेतकऱ्यास तब्बल ९ हजाराचे बिल आले आहे. याविरोधात शेतकऱ्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

महावितरणच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे समोर येत असतात. घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकाला लाखोंच्या घरात वीज बिले पाठवल्याचे प्रकार आपण याआधी पाहिले आहेत. आता सातारा जिल्ह्यात असाच प्रकार समोर आला आहे. विजेचे कनेक्शन नाही,  त्यामुळे वीज अगदी शुन्य वापर, तरीही शेतक-याला तब्बल ९ हजार आठशे पन्नास रुपयांचे बिल पाठवले आहे. बिल हातात पडताच शेतकरी कुटुंबासमोठा धक्का बसला आहे. कराड तालुक्यातील नांदगाव येथेहा प्रकार घडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

काय आहे प्रकार -

कराड तालुक्यातील नांदगाव गावात राहणारे महादेव पाटीलया शेतकऱ्याने साडे सात एचपी पाण्याच्या पंपासाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी महावितरण कंपनीकडे अर्ज केला होता. मात्र महावितरण कंपनीकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. वर्षभर महादेव पाटील यांना वीज कनेक्शनची वाट पाहावी लागली.

अजूनही वीज कनेक्शन न मिळालेल्या महादेव पाटील यांना थेट वीजबिलच देण्यात आले आहे. वीज वापर न करताच शेतकऱ्यास बिल आले आहे तेही थोडे थोडके नव्हे तर तब्बल ९ हजार ८५० रुपयांचे. हे बिल पाहून पाटील कुटुंबास चांगलाच धक्का बसला. कनेक्शन नाही, वीज वापर नाही तरीही बिल पाठविल्याने त्यांनी महावितरण कार्यालयात याची तक्रार केली. मात्र त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर न देता आलेले बिल भरण्यास सांगितले.

 

यामुळे महादेव पाटील संतप्त झाले असून त्यांनी महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या