मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahavitran : महावितरणचा थकबाकीदारांना शॉक.. ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Mahavitran : महावितरणचा थकबाकीदारांना शॉक.. ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Mar 25, 2023, 09:48 PM IST

  • Mahavitran News : वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Mahavitran

Mahavitran News : वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

  • Mahavitran News : वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबाद - वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत औरंगाबाद परिमंडलातील ९ हजार ७१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी पोलीस ॲक्शनमोडमध्ये, पब, बार मालकासह आणखी तिघांना अटक

Pune Car accident: पप्पांनीच मला गाडी दिली, मी दारूही पितो! पोरशे कार अपघातातील आरोपी मुलांची धक्कादायक कबुली

HSC Result 2024 Live : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

Navi Mumbai: मॉरेशियन नागरिकाची दगडाने ठेचून हत्या; २० वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन मुलींना अटक, परिसरात खळबळ

थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या 'ऑन फिल्ड' आहेत. एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. 

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची विभाग, मंडल व परिमंडल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. थकबाकीदार हा शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास दोहोंविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यात सुटीच्या दिवशीही महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. महावितरण संकेतस्थळ व अॅपद्वारे वीजबिल भरणा करण्याची  'ऑनलाइन' सोय उपलब्ध आहे.

औरंगाबाद परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीतील ३ लाख ७९ हजार ५४६ ग्राहकांकडे ६५० कोटी रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. शहर मंडलातील १ लाख १३ हजार १७४ ग्राहकांकडे ६० कोटी २४ लाख रुपयांची थकबाकी आहे. ग्रामीण मंडलातील १ लाख ५८ हजार ७४८ ग्राहकांकडे ३७० कोटी ५१ लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. जालना मंडलातील  १ लाख ७ हजार  ६२४ ग्राहकांकडे  २१९  कोटी  ४७ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकी न भरणाऱ्या औरंगाबाद परिमंडलातील  ९ हजार ७१ जणांचा वीजपुरवठा खंडित आला आहे. त्यात औरंगाबाद शहर मंडलातील  २०९५,  औरंगाबाद ग्रामीण मंडलातील ४०७१ तर जालना मंडलातील २९०५ ग्राहकांचा समावेश आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या