मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महावितरणचा थकबाकीदारांना ‘शॉक’; ४० हजारांहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

महावितरणचा थकबाकीदारांना ‘शॉक’; ४० हजारांहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Mar 21, 2023, 11:21 PM IST

  • Electricity supply cut :गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे परिमंडलातील ४० हजार ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

Electricity supply cut :गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे परिमंडलातील ४० हजार ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

  • Electricity supply cut :गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे परिमंडलातील ४० हजार ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू करण्यात आली आहे. वारंवार आवाहन करूनही वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. यामध्ये थकबाकीदारांवर कारवाई अधिक कडक करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे परिमंडलातील ४० हजार ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Khandala Accident: खंडाळा घाटात भीषण अपघात; कंटेनर- कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Viral Video : तरुणानं चक्क ८ वेळा मतदान केलं, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच आहे. वीज खरेदी,  दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापना हा सर्व खर्च वीजबिल वसुलीवरच अवलंबून आहे. मात्र, वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला वेग देण्यात आला. यात गेल्या दीड महिन्यात ४० हजार ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

पुणे परिमंडलातील ६ लाख ६ हजार ५६८ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे मिळून १३२ कोटी ८९ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये पुणे शहरातील २ लाख ६५ हजार ३५८ ग्राहकांकडे ४४ कोटी ७८ लाख आणि पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख २८ हजार ५ ग्राहकांकडे ३३ कोटी ८ लाख रुपये, तर ग्रामीणमध्ये आंबेगाव, जुन्नर,  मावळ, खेड,  मुळशी,  वेल्हे, हवेली तालुक्यांतील २ लाख १३ हजार २०५ ग्राहकांकडे ५५ कोटी ३ लाख रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या