मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahavitaran : ‘विघ्नहर’ वर आर्थिक संकटाचे ‘विघ्न’, महावितरणने ठोठावला ५६ लाखांचा दंड

Mahavitaran : ‘विघ्नहर’ वर आर्थिक संकटाचे ‘विघ्न’, महावितरणने ठोठावला ५६ लाखांचा दंड

May 27, 2023, 11:50 PM IST

  • vighnahar sahakari sugar factory : ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या वीज बिलांची थकीत वीज देयके ऊस बिलाच्या रकमेतून वसूल न केल्याने महावितरण कंपनीकडून कारखान्यावर ५६ लाख ७२ हजार १५२ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

vighnaharsahakarisugarfactory : ऊस पुरवठादारशेतकऱ्यांच्या वीज बिलांची थकीत वीज देयके ऊस बिलाच्या रकमेतून वसूल न केल्याने महावितरण कंपनीकडून कारखान्यावर ५६ लाख ७२ हजार १५२ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

  • vighnahar sahakari sugar factory : ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या वीज बिलांची थकीत वीज देयके ऊस बिलाच्या रकमेतून वसूल न केल्याने महावितरण कंपनीकडून कारखान्यावर ५६ लाख ७२ हजार १५२ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पुणे – नारायणगाव येथील विघ्नहर कारखान्यावर महावितरणने कारवाई केली आहे. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या वीज बिलांची थकीत वीज देयके ऊस बिलाच्या रकमेतून वसूल न केल्याने महावितरण कंपनीकडून कारखान्यावर ५६ लाख ७२ हजार १५२ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे विघ्नहरवर मोठे आर्थिक विघ्न आले आहे. यामुळे कारखान्यास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Khandala Accident: खंडाळा घाटात भीषण अपघात; कंटेनर- कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Viral Video : तरुणानं चक्क ८ वेळा मतदान केलं, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Porsche accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी पोलीस ॲक्शनमोडमध्ये, पब, बार मालकासह आणखी तिघांना अटक

शेरकर म्हणाले, ऊस बिलातून वीज बिले कापून घेण्यास सर्व शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवला. विघ्नहरच्या ६ मेगावॅट क्षमता असलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे वीज करारानुसार ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलांमधून संबंधित शेतकरी वर्गाच्या थकीत वीज देयकांची रक्कम कारखान्याने वसूल करून देण्याचे नमूद होते. मात्र सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे ऊस बिलातून थकीत वीज देयके कपात करण्यास प्रखर विरोध दर्शविला.

कारखान्याने संबंधितांची थकीत वीज देयके ऊस बिलांमधून वसूल केली नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्गास दिलासा मिळाला. मात्र, वीज वितरण कंपनीने विघ्नहर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून थकीत वीज देयके वसूल न केल्यामुळे कारखान्यास २०२०-२१ या वर्षासाठी २६ लाख २१ हजार ६० रुपये, तर २०२१-२२ या वर्षासाठी ३० लाख ५१ हजार ९२ रुपये असा ५६ लाख ७२ हजार १५२ रुपये दंड आकारला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या