मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महावितरणचा भोंगळ कारभार.. घरात ३ बल्ब अन् एक पंखा, बिल आलं तब्बल ४ लाख; व्यावसायिक ‘शॉक’

महावितरणचा भोंगळ कारभार.. घरात ३ बल्ब अन् एक पंखा, बिल आलं तब्बल ४ लाख; व्यावसायिक ‘शॉक’

May 28, 2023, 06:07 PM IST

  • electricity bill : बांगड्या विकून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यवसायिकाला महावितरणाकडून चक्क चार लाखांचं बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहून या व्यवसायिकाला दरदरून घाम फुटला.

महावितरणकडून चार लाखांचे बिल

electricitybill : बांगड्या विकून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यवसायिकाला महावितरणाकडून चक्क चार लाखांचं बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहून या व्यवसायिकाला दरदरून घाम फुटला.

  • electricity bill : बांगड्या विकून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यवसायिकाला महावितरणाकडून चक्क चार लाखांचं बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहून या व्यवसायिकाला दरदरून घाम फुटला.

महावितरण आपल्या सेवेबाबत अनेक दावे करत असते मात्र अनेकदा चुकीचं बिल रिडींग व अव्वाच्या सव्वा वीज बिले आल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत.महावितरणच्या या मनमानी कारभाराचा अनेकांना फटका बसला आहे. आता असाच प्रकार मनमाडमध्ये समोर आला आहे. बांगड्या विकून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यवसायिकाला महावितरणाकडून चक्क चार लाखांचं बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहून या व्यवसायिकाला दरदरून घाम फुटला.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत बुडाली बोट; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

या व्यावसायिकाचे म्हणणे आहे की, दर महिन्याला आपण वीजबिल भरणा करत आहोत,तरीही एवढ्या मोठ्या रकमेचं बिल आलं आहे. याची तक्रार केल्यानंतरही कोणी दखल घेतली नाही, उलट बिल न भरल्यानं विद्युत मीटर काढून नेल्याचा आरोप या व्यक्तींनं केला आहे. या प्रकाराची सध्या शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मनमान शहरातील सरदार पटेल रोडवर राहणारे इकबाल शेख यांचा शिवाजी चौकात बांगड्या विकण्याचा छोटासा स्टॉल आहे. बांगड्या विकून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या छोट्याशा घरात केवळ तीन बल्ब आणि एक पंखा एवढीच इलेक्ट्रिकची उपकरणं आहेत. मात्र त्यांना महावितरणकडून तब्बल ४ लाख ५ हजार ४९० रुपयांचं बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहून त्यांना धक्काच बसला.

या बिलाबाबत शेख यांनी महावितरण कार्यालयात तक्रार केली. मात्र या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्याने चार लाखांचे बिल कमी करून ते २ लाख १३ हजार ३६० एवढे केले व त्यांना तातडीनं वीजबिलाचा भरणा करण्यास सांगितलं. मात्र माझी थकबाकी नसताना मी एवढं बिल कसं भरू अशी विचारणा शेख यांनी केली. मात्र त्यांचे कोणीही ऐकून घेतले नाही.

 

वीजबिल न भरल्यामुळे त्यांचं मीटर काढून नेले व त्यांना अंधारात राहण्याची वेळ आली, असा दावा त्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत वीज महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, कर्मचाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या