मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Holi Tips : होळी, रंगपंचमी साजरी करताना कशी घ्याल विजेची काळजी; महावितरणनं दिल्या टिप्स

Holi Tips : होळी, रंगपंचमी साजरी करताना कशी घ्याल विजेची काळजी; महावितरणनं दिल्या टिप्स

Mar 07, 2023, 12:07 PM IST

  • Mahavitaran Safety Tips for Holi : होळी आणि रंगपंचमीचा जल्लोष करताना विजेच्या सुरक्षेची काळजी घेण्यास विसरू नका, असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

Mahavitaran

Mahavitaran Safety Tips for Holi : होळी आणि रंगपंचमीचा जल्लोष करताना विजेच्या सुरक्षेची काळजी घेण्यास विसरू नका, असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

  • Mahavitaran Safety Tips for Holi : होळी आणि रंगपंचमीचा जल्लोष करताना विजेच्या सुरक्षेची काळजी घेण्यास विसरू नका, असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

Mahavitaran Safety Tips for Holi : देशभरात कालपासून होळीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात काल सर्वत्र होळी दहन करण्यात आलं आणि रंगपंचमीचा आनंद घेतला जात आहे. मात्र, हा उत्सव साजरा करताना व रंगांची उधळण करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी आणि सणाचा आनंद द्विगुणित करावा, असं आवाहन महावितरणनं केलं आहे. महावितरणनं या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Khandala Accident: खंडाळा घाटात भीषण अपघात; कंटेनर- कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Viral Video : तरुणानं चक्क ८ वेळा मतदान केलं, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Porsche accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी पोलीस ॲक्शनमोडमध्ये, पब, बार मालकासह आणखी तिघांना अटक

  • होळी पेटवताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते.
  • अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्यानं, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील.
  • होळीसाठी शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा. ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या.
  • धुळवडीस रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यांपर्यंत उडणार नाहीत याची काळजी घ्या. शक्यतो रंग भरलेले फुगे फेकू नका. रंग उडवताना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाहीत याची खबरदारी घ्या.
  • वीज वितरण यंत्रणेची रोहित्रं व तत्सम वितरण उपकरणं बसविलेल्या जागेपासून लांब अंतरावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीरानं वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळं विजेच्या खांबांना स्पर्श करू नका.
  • विजेच्या खांबांभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. घरात रंग खेळताना वीज मीटर, प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा. ओल्या हाताने विजेच्या बटनांना स्पर्श करू नका.

हे विसरू नका!

• वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर होळी पेटवा.

• होळी आणताना तिचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये.

• वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका.

• ओल्या शरीराने वीज उपकरणांना स्पर्श करू नका.

• विजेच्या खांबांभोवती पाण्याचा निचरा करू नका.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या