मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahavitaran Pune : वीज तोडताच डांबून ठेवलं, अंगावर सोडले कुत्रे; महावितरण कर्मचाऱ्यांसोबत धक्कादायक प्रकार

Mahavitaran Pune : वीज तोडताच डांबून ठेवलं, अंगावर सोडले कुत्रे; महावितरण कर्मचाऱ्यांसोबत धक्कादायक प्रकार

Sep 30, 2023, 12:37 PM IST

    • Pune Crime News : पुण्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली आहे.
Pune Crime News Marathi (HT_PRINT)

Pune Crime News : पुण्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली आहे.

    • Pune Crime News : पुण्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली आहे.

Pune Crime News Marathi : पाच हजार रुपयांचे लाईटबील थकल्याने वीज तोडणी करायला आलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. वीज कापल्याच्या रागातून दाम्पत्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवत त्यांच्या अंगावर कुत्रे सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या प्रभात रोडवर ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. डेक्कन पोलिसांनी आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू केली असून या घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche accident: पुणे हीट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध

Maharashtra Weather Update : राज्यात तापमान वाढणार! पालघर, ठाणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यात हीट वेव्ह; आयएमडीचा यलो अलर्ट

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील प्रभात रोडवरील एका कुटुंबाचं लाईटबील थकलेलं होतं. त्यामुळं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांच्या घरातील वीज कापली. त्याचवेळी दोन महिला आणि एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी वीज बील भरल्यास आम्ही वीजपुरवठा सुरळीत करू, असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. परंतु आरोपी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी आरोपींनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मजल्यावरील लिफ्टचा दरवाजा बंद केला आणि आत कुत्री सोडली. त्यामुळं घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने महावितरणच्या ऑफिसमध्ये संपर्क साधला. तसेच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभात रोडवर एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याची घटना समोर आल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या