मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahavitaran : मीटर रीडिंग एजन्सीजविरोधात कारवाईचा बडगा उगारताच विजेची अचूक बिले

Mahavitaran : मीटर रीडिंग एजन्सीजविरोधात कारवाईचा बडगा उगारताच विजेची अचूक बिले

Aug 19, 2022, 06:18 PM IST

    • Mahavitaran :महावितरणने मीटर रीडिंगध्ये हयगय करणाऱ्या एजन्सीजच्या कामांचे मूल्यांकन करून त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.
महावितरण

Mahavitaran :महावितरणनेमीटर रीडिंगध्ये हयगय करणाऱ्या एजन्सीजच्या कामांचे मूल्यांकन करून त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

    • Mahavitaran :महावितरणने मीटर रीडिंगध्ये हयगय करणाऱ्या एजन्सीजच्या कामांचे मूल्यांकन करून त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

औरंगाबाद -  वीज बिलामध्ये फेरफार करून वीज बिलात गफलत करणाऱ्या एजन्सीजवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारल्याने सामान्य वीज ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. महावितरणने मीटर रीडिंगध्ये हयगय करणाऱ्या एजन्सीजच्या कामांचे मूल्यांकन करून त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना नाहक मन:स्ताप होत हातो. त्याचसोबत वीजबिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसानही होत होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राबविलेल्या विशेष प्रयत्नांमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचूकता मोठ्या प्रमाणात वाढली. एप्रिल ते जून २०२२ या ३ महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल ३ टक्क्यांनी  (८२५ दशलक्ष युनिट) वाढ झाली आहे. 

उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यांना महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे यासाठी महावितरणने गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे याप्रकारे मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू करीत राज्यातील तब्बल ७६ मीटर रीडिंग एजन्सींजना बडतर्फ करण्यात आले. तसेच महावितरणच्या ४१ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. परंतु सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे अचूक बिलिंगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरू असलेल्या उपायांमुळे बिलिंग व रीडिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. मीटर रीडिंग हे अचूक व गुणवत्तेनुसार होईल यासाठी कायम काळजी घेण्यात येईल. तसेच वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाही तर एजन्सीजविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची समज देखील या एजन्सींजना देण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या