मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  देव तारी त्याला.. ३० फूट उंचीवरून कोसळूनही चिमुकली उठून चालू लागली, पाहा VIDEO

देव तारी त्याला.. ३० फूट उंचीवरून कोसळूनही चिमुकली उठून चालू लागली, पाहा VIDEO

Apr 27, 2023, 07:34 PM IST

  • Girl Viral Video : एक मुलगी ३० फूट उंचीवरून बाल्कनीतून जमिनीवर कोसळते. त्यानंतर जे झाले त्याचा कोणी विचारही करू शकत नाही.

viral video

GirlViral Video : एकमुलगी ३० फूट उंचीवरून बाल्कनीतून जमिनीवर कोसळते. त्यानंतर जे झाले त्याचा कोणी विचारही करू शकत नाही.

  • Girl Viral Video : एक मुलगी ३० फूट उंचीवरून बाल्कनीतून जमिनीवर कोसळते. त्यानंतर जे झाले त्याचा कोणी विचारही करू शकत नाही.

सोशल मीडियावर सध्या अशा काही गोष्टी व्हायरल होत असतात त्या पाहून डोळ्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाहून तुम्ही म्हणाल की, हा चमत्कार आहे. एक मुलगी ३० फूट उंचीवरून बाल्कनीतून जमिनीवर कोसळते. त्यानंतर जे झाले त्याचा कोणी विचारही करू शकत नाही. ३० फूट उंचीवरून कोसळल्यानंतर एखाद्या मुलाची काय अवस्था होईल याची कल्पना केली जाऊ शकते. मात्र जे घडले ते पाहून लोक तोंडात बोटे घालत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी पोलीस ॲक्शनमोडमध्ये, पब, बार मालकासह आणखी तिघांना अटक

Pune Car accident: पप्पांनीच मला गाडी दिली, मी दारूही पितो! पोरशे कार अपघातातील आरोपी मुलांची धक्कादायक कबुली

HSC Result 2024 Live : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

Navi Mumbai: मॉरेशियन नागरिकाची दगडाने ठेचून हत्या; २० वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन मुलींना अटक, परिसरात खळबळ

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, इमारतीच्या बाल्कनीतून जवळपास ३० फूट उंचीवरून एक चिमुकली खाली कोसळते मात्र जमिनीवर पडताच ती उठून पुन्हा चालू लागते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. मीडियो रिपोर्ट्सनुसार ही घटना वाशिम जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी चार वर्षाची आहे. ही मुलली वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात महानंदा कॉलनीत रहात आहे. ती घराच्या बाल्कनीत खेळत होती. खेळताना तोल गेल्याने ती खाली कोसळली. घरासमोर एक बाईक उभी होती. मुलगी ३० फुटावर आधी बाईकच्या सीटवर कोसळली. त्यानंतर ती जमिनीवर पडली. जमिनीवर पडल्यानंतर मुलगी स्वत:हून उठली व घरात पळून गेली.

रशियामध्येही अशीच घडली होती घटना -
रशियामध्येही एक व्यक्ती १९ व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली कोसळला होता. तो दारूच्या नशेत होते. आर्थर नावाचा व्यक्ती बाल्कनीतील रेलिंगवर चालत होता. तेथून तोल गेल्याने तो कोसळला व खाली पार्क केलेल्या कारवर पडला. या घटनेत आर्थरला काहीच झाले नाही. कारवर पडल्यानंतर तो उठला व चालू लागला. तो गंभीररित्या जखमी झाला नाही. मात्र त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या