मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pradeep Kurulkar: प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही? जयंत पाटलांचा खडा सवाल

Pradeep Kurulkar: प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही? जयंत पाटलांचा खडा सवाल

Aug 03, 2023, 03:32 PM IST

  • Jayant Patal On Pradeep Kurulkar: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी प्रदीप कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल उपस्थित केला.

Jayant Patil (HT)

Jayant Patal On Pradeep Kurulkar: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी प्रदीप कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल उपस्थित केला.

  • Jayant Patal On Pradeep Kurulkar: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी प्रदीप कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल उपस्थित केला.

Maharashtra Monsoon Session: पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय संरक्षण क्षेत्राची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या पुण्यातील डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभेत मागणी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील एका प्रयोग शाळेचे संचालक राहिलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी शत्रूराष्ट्र असेलेल्या पाकिस्तानी हेराला अतिशय संवेदनशील माहिती दिल्याचे उघड झाले. त्यांच्याविरोधात सध्या फक्त अधिकृत गुप्त कायद्यानुसार (official secreat act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, त्यांच्याविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार (UAPA) गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उपस्थित केला. या अधिकाऱ्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवायला हवा. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा खटला का चालला नाही, याची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना द्या, अशी मागणी त्यांना विधानसभा अध्यक्षांकडे केली.

कुरूलकरांनी भारतीय क्षेपणास्त्र यंत्रणा, तसेच सुरू असलेले विविध प्रकल्प या सोबतच ड्रोन तसेच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे वेळापत्रक देखील पाकिस्तानी गुप्तचर एजंटला दिली. एवढेच नाही तर, नुकतेच भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या राफेल विमानाबाबत देखील त्यांनी पाकिस्तानी हेराला माहिती दिल्याचे त्यांच्या चॅटमध्ये उघड झाले.

याचबरोबर कुरूलकरांनी अनेक महत्वाची कागदपत्रे आणि ब्ल्यु प्रिंट सोबत गोपनीय आणि संवेदनशील कागदपत्रे त्यांच्या मोबाइलमध्ये सेव्ह केले होते. एटीएसने याप्रकरणातसीआयरपीसी१६१ प्रमाणे ६९ जणांचे तरल तीन साक्षीदारांचे सीरअारपीसी१६४ प्रमाणे जबाब नोंददवून गोपनीय कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या