मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Urfi Javed : उर्फी जावेदच्या तक्रारीनंतर महिला आयोग अॅक्शनमोडमध्ये; पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश

Urfi Javed : उर्फी जावेदच्या तक्रारीनंतर महिला आयोग अॅक्शनमोडमध्ये; पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश

Jan 17, 2023, 02:04 PM IST

  • मॉडेल उर्फी जावेदने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Rupali Chakankar

मॉडेल उर्फी जावेदने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  • मॉडेल उर्फी जावेदने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra State Commission for Woman: उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. तर, उर्फीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात न्युडिटी पसिरवल्याबद्दल अटकेची मागणी केली आहे. तर, उर्फीनेही महाराष्ट्र राज्य महिला आयोगास चित्रा वाघविरोधात तक्रारी अर्ज दाखल केला, ज्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

उर्फी जावेदचा तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाईचे आणि कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे आदेश दिले. याचबरोबर भारतीय घटनेने देशातील प्रत्येकाला मु्क्त संचाराचा हक्क दिला आहे, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही अतिशय गंभीर बाब आहे, असंही महिला आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

उर्फी जावेदने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की, “मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून श्रीमती चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत. माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही. मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी”, अशीही मागणी उर्फी जावेदने आपल्या पत्रातून केली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या