मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Schools : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळा १५ जूनपासून तर विदर्भातील शाळा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

Maharashtra Schools : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळा १५ जूनपासून तर विदर्भातील शाळा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

Apr 18, 2023, 07:56 PM IST

  • Summer Vacation: राज्यातील शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या असून उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर  राज्यातील शाळा यंदा १५ जून रोजी सुरू होणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

Summer Vacation: राज्यातील शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या असून उन्हाळ्याच्या सुट्टीनंतरराज्यातील शाळा यंदा १५ जून रोजी सुरू होणार आहेत.

  • Summer Vacation: राज्यातील शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या असून उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर  राज्यातील शाळा यंदा १५ जून रोजी सुरू होणार आहेत.

मुंबई : राज्यातील शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या असून उन्हाळ्याच्या सुट्टीनंतरराज्यातील शाळा यंदा १५ जून रोजी सुरू होणार आहेत. तर विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्या ठिकाणी ३० जूनपासून शाळा सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. मुलांना व पालकांना आपल्या सुट्यांचे व्यवस्थित नियोजन करता यावे यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आल्याचे दिपक केसरकर म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

शिक्षणमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार. केंद्र सरकारचा नवभारत साक्षरता कार्यक्रम राज्यात लागू केला जाणार आहे. यापुढे सरकारी व महापालिका तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेचपाठ्यपुस्तकात प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.

२० मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे. शिक्षक सेवकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.

कमी पटसंख्येच्या शाळा बंद कराव्या लागू नयेत यासाठीही प्रयत्न असल्याचे केसरकर म्हणाले. मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये करणार आहोत. मुलाच्या शाळेतील पहिल्या दिवसाचं स्वागत केलं जाणार असल्याचं ते म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या