मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajya Sabha polls: राज्यसभा निवडणुकीचं मतदान संपलं, पण मतमोजणी लांबली, कारण…

Rajya Sabha polls: राज्यसभा निवडणुकीचं मतदान संपलं, पण मतमोजणी लांबली, कारण…

Jun 10, 2022, 06:50 PM IST

    • Maharashtra RS Polls Result delay: भारतीय जनता पक्षानं काही आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्यामुळं मतमोजणी रखडली आहे. त्यामुळं निकाल येण्यास विलंब लागणार आहे.
Rajya Sabha Election Results

Maharashtra RS Polls Result delay: भारतीय जनता पक्षानं काही आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्यामुळं मतमोजणी रखडली आहे. त्यामुळं निकाल येण्यास विलंब लागणार आहे.

    • Maharashtra RS Polls Result delay: भारतीय जनता पक्षानं काही आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्यामुळं मतमोजणी रखडली आहे. त्यामुळं निकाल येण्यास विलंब लागणार आहे.

Maharashtra RS Polls Results: राज्यसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झालं असून आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. मतमोजणी सायंकाळी पाच वाजता सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र, भारतीय जनता पक्षानं (BJP) काही आक्षेप घेतल्यामुळं मतमोजणी रखडली आहे. त्यामुळं निकाल येण्यास विलंब लागणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local : मुंबईत वादळी पावसाने ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत; ठाणे, घाटकोपर स्टेशनवर तुडूंब गर्दी, नोकरदारांचे हाल

Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यभरात वादळी वारे अन् अवकाळीचा तडाखा, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

VIDEO : मुंबईत एका तासातच पावसाने हाहाकार..! पार्किंग लिफ्ट कोसळली, पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळून ८ जण ठार, ६० जखमी

राज्य विधानसभेची सदस्य संख्या २८८ आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन आणि तुरुंगात असलेले माजी मंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी न मिळाल्यामुळं २८५ उमेदवारांनी निवडणुकीसाठी मतदान केलं. प्रत्येक मत महत्त्वाचं असल्यानं काही आमदार रुग्णवाहिकेनं तर काही वॉकर घेऊन मतदानास आले होते. मतदान पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच मतमोजणी सुरू होईल, असं बोललं जात होतं. मात्र, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका दुसऱ्यांच्या हातात देऊन निवडणूक नियमांचा भंग केल्याचा आक्षेप भाजपनं घेतला आहे. या दोघांचंही मत बाद करावं, अशी मागणी भाजपनं निवडणूक आयोगाकडं केली आहे. तर, महाविकास आघाडीनंही सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका आशिष शेलार यांच्याकडं दिली, असा आक्षेप काँग्रेसचे अमर राजुरकर यांनी नोंदवला आहे. या आक्षेपावर विचार करून केंद्रीय निवडणूक आयोग पुढील निर्णय घेणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या परवानगीनंतरच मतमोजणी सुरू होणार आहे. मतदान संपून जवळपास अडीच तास उलटल्यानंतरही आयोगाकडून कुठलाही आदेश आलेला नाही. त्यामुळं सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आक्षेप मान्य करून निवडणूक आयोगानं काही आमदारांची मतं बाद केल्यास चित्र बदलेल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील बातम्या