मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal Flood: यवतमाळमध्ये धुंवाधार पाऊस; घरे, रस्ते पाण्याखाली, अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू

Yavatmal Flood: यवतमाळमध्ये धुंवाधार पाऊस; घरे, रस्ते पाण्याखाली, अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू

Jul 22, 2023, 03:11 PM IST

  • Yavatmal Rains Updates: यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Rains

Yavatmal Rains Updates: यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

  • Yavatmal Rains Updates: यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Rains: यवतमाळमध्ये गुरुवारी रात्रीपासून धुंवाधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून वाहतूक विस्कळीत झाली. जिल्ह्यातील अनेक घरे आणि रस्ते पाण्याखाली आल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून नदी नाल्यांना पूर आले आहे. जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

यवतमाळच्या महागावमध्ये पुरात अडकलेल्यांची नागरिकांची हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली. हवामान सुधारल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. पाच वेगवेगळ्या ठिकाणी एसडीआरएफकडून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

यवतमाळमध्ये बुधवारी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी पावसाने रौद्ररुप धारण केले. उमरखेड तालुक्यात ६९.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय, महागाव (४९.३ मिमी), आर्णी (५७.४ मिमी), दिग्रस (११.८ मिमी), पुसद (९.६ मिमी), नेर (३.९ मिमी), वणी (२० मिमी), मारेगाव (१४.५ मिमी), झरी (१०.९ मिमी), केळापुर (१५.२ मिमी), घांटजी (१५.५ मिमी), राळेगाव (६८ मिमी), दारव्हा (८८ मिमी), बाभुळगाव (८ मिमी), कंळब (४.२ मिमी) आणि यवतमाळ तालुक्यात सरासरी ३८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या