मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Forecast : राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा, मुंबईत मुसळधार

Weather Forecast : राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा, मुंबईत मुसळधार

Sep 07, 2022, 11:23 PM IST

    • भारतीय हवामान खात्याने (Maharashtra rain update ) पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केले आहेत.
राज्यातपुढीलपाच दिवस जोरदार पावसाचा इशारा,

भारतीय हवामानखात्याने (Maharashtra rain update) पुढीलपाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केले आहेत.

    • भारतीय हवामान खात्याने (Maharashtra rain update ) पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केले आहेत.

मुंबई–जुलै महिन्यात हाहाकार माजवलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली होती. मात्र गणपतीच्या आगमनाबरोबरच राज्यात पावसानेही पुनरागमन केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची रिपरिप सुरू आहे. विदर्भात वादळी वारे वविजांच्या गडगडासह पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी दिवसभर उन्हाचा कडाका व कमाल उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान खात्याने (Maharashtra rain update) पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

गुरुवारी राज्यात जोरदार वाऱ्यासह,विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला ८ ते ११ सप्टेंबर पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येलो अलर्टच्या काळात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुरुवारी व शुक्रवारी राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकांना अडचण येणार आहे. गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यासाठी १० व ११ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट दिला आहे.  त्यामुळं त्या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

८ सप्टेंबर रोजी भारतीय हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

९ सप्टेंबर रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तिथे मुसळधार पाऊस होऊ शकतो. नंदूरबार, धुळे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

स्कायमेटनं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस होईल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या