मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rain Alert : मुंबई-पुण्यासह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोल्हापूरकरांच्या मनात धडकी

Rain Alert : मुंबई-पुण्यासह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोल्हापूरकरांच्या मनात धडकी

Jul 24, 2023, 10:44 PM IST

  •  Maharashtra rain Update : मंगळवारी मुंबई, पुणेसह ठाण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Maharashtra rain Update

Maharashtra rain Update : मंगळवारी मुंबई, पुणेसह ठाण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबरकोकण,गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही मुसळधार पाऊस बरसण्याचीशक्यता आहे.

  •  Maharashtra rain Update : मंगळवारी मुंबई, पुणेसह ठाण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Rain Alert in Maharashtra : राज्यात गेल्या आठवड्यापासून अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत. अनेक दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. कोल्हापूरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने उद्या (मंगळवारी) अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २५ व २६ जुलै रोजी पश्चिम किनारपट्टीवरअतिवृष्टी होणारआहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

मंगळवारी मुंबई, पुणेसह ठाण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

गेल्या जवळपास आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पूर्व विदर्भाच्या काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणमध्ये येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात आजही पावसाचा “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सातारा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई, संभाजीनगर, जालना,परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

कोल्हापूरकरांच्या मनात धडकी -

मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पंचगंगा नदी ३९ फुटांच्या इशारा पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. येथील पंचगंगा नदीला पूर आला आहे. जिल्ह्यातील तब्बल ८२ बंधारे नदीच्या पाण्याखाली बुडाले असून येथील महत्वाचा असलेला बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या सोबतच १४ मार्गावरून सुरक्षेचा उपाय म्हणून एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या