मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain : पुढील २ दिवस धोक्याचे! मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, दरडी कोसळण्याची भीती

Maharashtra Rain : पुढील २ दिवस धोक्याचे! मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, दरडी कोसळण्याची भीती

Jun 27, 2023, 05:44 PM IST

  • Maharashtra rain update :पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra rain update

Maharashtra rain update :पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • Maharashtra rain update :पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Landslides Alert : महाराष्ट्रात मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी आता संपूर्ण राज्यात सक्रीय झाला आहे. गेल्या २ दिवसांपासून मान्सूनने दमदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसत आहे. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात २७ आणि २८ जून रोजीऑरेंज आणि पिवळा अलर्ट असेल, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही महत्त्वाच्या भागात आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, २९ आणि ३० जून रोजी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे, मात्र यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

मुंबई कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत आहे. अशातच राज्यासाठी पुढील ४८ तास अतिमहत्वाचे आहे. कारण, येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे याठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

'सतर्क'ने याबाबत अपडेट दिले आहे. त्यामुळे घाट माथ्यावरून प्रवास करताना वाहनधारकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस नाशिक, मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांनाही मंगळवारी, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याला बुधवारी “ऑरेंज अ‍ॅलर्ट” देण्यात आला आहे. पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

त्याबरोबर नाशिक, पुणे आणि सातारासह विदर्भात अमरावती, नागपूर येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया येथे काही ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊसही होऊ शकेल. या काळात विदर्भामध्ये मेघगर्जनेचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुढील बातम्या