मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Exam : मुलांनो तयारीला लागा! एमपीएससीच्या २०२४ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

MPSC Exam : मुलांनो तयारीला लागा! एमपीएससीच्या २०२४ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Dec 15, 2023, 08:35 AM IST

    • MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या (MPSC) २०२४च्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
MPSC Exam Schedule 2024

MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या (MPSC) २०२४च्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

    • MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या (MPSC) २०२४च्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा एकदा २०२४ मधील परीक्षांचे संभाव्य सुधारित वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. यावेळी देखील आयोगाने हे वेळापत्रक संभाव्य असल्याचे सांगत परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो असे म्हटले आहे. परीक्षांच्या बदलांबाबत उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल, असे देखील आयोगामार्फत सांगण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

थरकाप उडवणाऱ्या पुण्यातील कार Porsche Car अपघाताचा VIDEO व्हायरल; पाहून अंगावर काटा येईल

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Weather update: गारठा वाढल्याने शेकोट्या पेटू लागल्या! राज्यात पुढील काही दिवस असे असेल हवामान, वाचा सविस्तर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

आयोगाने परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आगामी परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रक पाठवून दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Guinness World Record Pune : गोष्टी सांगण्यात पुणेकर पटाईत! चीनचा रेकॉर्ड मोडला! एसपी ग्राऊंडवर नवा विश्वविक्रम

आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा, व मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट -ब सेवा मुख्य परीक्षा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी, अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैद्यमापक शास्त्र मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षांचा समावेश आहे. सदर वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उप सचिव दे.वि. तावडे यांनी केले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या