मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तुमच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय, मनाचे खेळ खेळू नका; मविआच्या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांचा पटोलेंवर हल्लाबोल

तुमच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय, मनाचे खेळ खेळू नका; मविआच्या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांचा पटोलेंवर हल्लाबोल

Jan 25, 2024, 05:30 PM IST

  • Prakash Ambedkar on Nana patole : जागावाटपाच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र या निमंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

Prakash Ambedkar on Nana patole

Prakash Ambedkar on Nana patole : जागावाटपाच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र या निमंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनीकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

  • Prakash Ambedkar on Nana patole : जागावाटपाच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र या निमंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

लोकसभेच्या जागावाटपाबाबत आयोजित केलेल्या बैठकीसाठी महाविकासआघाडीने दिलेल्या आमंत्रणावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रस नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. आज आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची महत्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडत आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र या निमंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली.. तु माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

प्रकाश आंबेडकर यांनी या निमंत्रण पत्राबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, नाना पटोले यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीसंबंधी निर्णय प्रक्रियेमध्ये कोणतेही अधिकार नसताना त्यांच्या सहीने वंचितला बैठकीसाठी कसे काय आमंत्रण दिलं गेलं. नाना पटोले यांना महाराष्ट्रात कुणाशी आघाडी करायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहेत का, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नाना पटोले हे महाराष्ट्राच्या जनतेसोबत माईंड गेम खेळत असून त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी केमिकल लोचा झाल्याची घणाघाती टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आंबेडकर म्हणाले की, २३ जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी स्पष्टपणे म्हटले की लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील केले जाईल. त्यावेळी तुम्ही बाजुलाच बसला होतात.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेस अध्यक्षांच्या सहीने निमंत्रण द्या. किंवा रमेश चेन्नीथाला, राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी अथवा मल्लिकार्जुन खर्गे यापैकी कोणीही वंचितला बैठकीसाठी आमंत्रित केल्यास आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

पुढील बातम्या