मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambadas Danve : राष्ट्रवादीतील बंडामागे १०० खोके; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याचा दावा

Ambadas Danve : राष्ट्रवादीतील बंडामागे १०० खोके; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याचा दावा

Jul 05, 2023, 05:50 PM IST

  • Ambadas Danve made allegations on NCP Rebels : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर आमदारांना १०० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

Ambadas Danve

Ambadas Danve made allegations on NCP Rebels : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर आमदारांना १०० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

  • Ambadas Danve made allegations on NCP Rebels : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर आमदारांना १०० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

Ambadas Danve on NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीर आमदारांवर खळबळजनक आरोप केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

राज्यातील सध्या घडामोडींवर दानवे यांनी एक ट्वीट केलं आहे. 'राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी प्रत्येकी १०० कोटी रुपये दिले जाणार असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. हे पैसे निधीच्या रुपात दोन वर्षांत दिले जाणार आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

'१०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डील सुरू असल्याची बातमी कानी पडली आहे, असं दानवे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘आर्थिक देवाण-घेवाणीबरोबरच कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच! पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का?,’ असा सवालही दानवे यांनी केला आहे.

Ambadas Danve Tweet

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडली तेव्हा फुटीर आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्यावरून ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा महाराष्ट्रासह देशातही गाजली होती. सोशल मीडियात आणि लोकांच्या तोंडावरही ही घोषणा होती. या घोषणेमुळं शिंदे गटातील आमदारही त्रस्त झाले होते. आता दानवे यांनी १०० कोटींचा आरोप केल्यामुळं राष्ट्रवादीच्या फुटीर आमदारांचीही अडचण होण्याची शक्यता आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या